सोलापूर :- सोलापूर जिल्ह्यात दिनांक 7 ते 11 जानेवारी 2013 या कालावधीत जिल्हा प्रशासन व बालचित्रसमिती, भारत यांचे संयुक्त विद्यमाने बालचित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची बैठक निवासी उपजिल्हाधिकारी पराग सोमण यांचे अध्यक्षतेखाली आज संपन्न झाली. 
           या सभेस  सोलापूर जिल्ह्यातील सर्व चिपपट गृहाचे चालक, व्यवस्थापक, शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सोलापूर, प्राथामिक, माध्यमिक यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बालचित्र समितीचे सहाय्यक वितरण अधिकारी पी. आर. हलदार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. हा महोत्सव यशस्वी पार पाडणेकामी निवासी उपजिल्हाधिकारी पराग सोमण यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. 

 
Top