मुंबई -: राज्यातून अखिल भारतीय व्यवसाय परीक्षेस बसणाऱ्या उमेदवारांची माहिती आस्थापनांनी फॉरमेट-3 व 3-ए हया विहित नमुन्यात आस्थापनेच्या पत्रासह शिकाऊ उमेदवारांचे संविदा किंवा करार पत्र ज्या मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचनापत्रात सादर केले आहेत, त्याच केंद्रात दि. 31 डिसेंबर 2012 पर्यंत पाठवावीत. तसेच उमेदवारांचे पात्रता प्रमाणपत्र विहित केलेल्या फॉरमेट - 4 मध्ये ही परीक्षा सुरु होण्यापूर्वी 15 दिवस परीक्षा केंद्रात पाठविण्यात यावे, असे सह संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांनी कळविले आहे.
  राष्ट्रीय व्यावसायिक प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांच्यामार्फत घेण्यात येणारी शिकाऊ उमेदवारांची 98 वी अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा साधारणपणे एप्रिल 2013 च्या शेवटच्या आठवडयात अपेक्षित आहे. या परीक्षेसाठीच्या विहित नमुन्यातील परीक्षा अर्जाचे शुल्क 10 रुपये असून एक वर्षाच्या अभ्यासक्रमाकरिता परीक्षा शुल्क 50 रुपये व दोन वर्षाच्या अभ्यासक्रमाकरिता 75 रुपये आहे. नियमित प्रशिक्षणार्थ्यांनी दि. 21 डिसेंबर 2012 पर्यंत आणि अनुत्तीर्ण उमेदवारांनी दि. 31 डिसेंबर 2012 पर्यंत अर्ज सादर करावेत. 
  शिकाऊ उमेदवारांबरोबर वरील अटी पूर्ण करणाऱ्या व खासगी उमेदवार म्हणून परीक्षेस बसू इच्छिणाऱ्या तसेच माजी खासगी उमेदवारांनी अर्जाच्या विहित नमुन्यांसाठी व सविस्तर माहितीपत्रकासाठी संबंधित जिल्हयातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्याशी संपर्क साधून दि. 12 जानेवारी 2013 पूर्वी अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

* उमेदवारांसाठी पात्रतेच्या अटी

  उमेदवार शिल्पकारागिर प्रशिक्षण योजनेंतर्गत संबंधित व्यवसाय अभ्यासक्रमाची परीक्षा उत्तीर्ण असावा. एन.टी.सी नंतर 1 वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी चार वर्ष व दोन वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी दोन वर्षाचा अनुभव आवश्यक. उमेदवार कार्यरत असलेली आस्थापना शिकाऊ उमेदवारी योजनेंतर्गत अथवा शासकीय/ निमशासकीय उपक्रमांतर्गत कार्यरत असावी.

 
Top