मुंबई -: महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे मार्फत पत्राद्वारे प्रशिक्षण (डी.एड) योजनेच्या अर्ज विक्रीची मुदत 17 नोव्हेंबर पर्यंत होती. आता या अर्ज विक्रीस दि. 4 डिसेंबर 2012 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
पात्र अप्रशिक्षित शिक्षकांनी मुख्याध्यापकांचे पत्र दिल्यानंतर त्यांना संबंधित जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या कार्यालयात सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत 4 डिसेंबर पर्यंत आवेदनपत्र मिळतील. भरलेली आवेदनपत्रे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या कार्यालयात दि. 5 डिसेंबर पर्यंत स्वीकारली जातील, असे संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांनी कळविले आहे.