पंढरपूर -: एड्स बाधीत रुग्णांना ए.आर.टी सेंटरच्या माध्यमातून चांगल्या प्रकारच्या वैद्यकीय सोयी-सुविधा देण्यात येतील.असे मत उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.पंकज गायकवाड यांनी व्यक्त केले.
जागतीक एड्स दिनानिमित्त उपजिल्हा रुग्णालयातर्फे परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी ए.आर.टी सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ.संभाजी पाचकवडे, डॉ.प्रसन्न भातलवंडे, डॉ.पी.डी.शेटे आदिजण उपस्थित होते.
या परिसंवादामध्ये शुन्य भेदभाव, शुन्य नवीन एच.आय.व्हीचा संसर्ग, शुन्य एड्समुळे होणा-या मृत्युचा या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी डॉ.पाचकवडे यांनी एड्स आजाराबद्दलच्या समाजातील गैरसमजुती तसेच पोषक आहार व औषध उपचारा विषयी माहिती दिली.तसेच ई.सी.जी तंत्रज्ञ श्री.हवेली यांनी एच.आय.व्ही आजाराला न घाबरता नियमित व्यायाम करणे,पोषक आहार घेणे व आपल्या कुटुंबियासमवेत जास्ती-जास्त वेळ देवून आनंदी व प्रसन्न राहण्यास सांगितले.
यावेळी एड्स बाधीत रुग्णांनी आपली मनोगते व्यक्त केली व ए.आर.टी विभागाकडून मिळणा-या औषध उपचाराबद्दल व कर्मचा-यांच्या सेवेबद्दल समाधान व्यक्त केले.कार्यक्रमाप्रसंगी उपजिल्हा रुग्णालयाचे एन.वाय.दलाल, श्रीमती मिनाक्षी चोळ्ळे, पुरुषोत्तम कदम, एजाज बागवान, श्रीमती. विद्यादेवी बनकर, बाळासाहेब पांढरे तसेच एड्स बाधीत रुग्ण उपस्थित होते.