उस्मानाबाद जिल्ह्यात सरत्या वर्षात अनेक गुन्हे घडले. गुन्हे वाढणे हे सामाजिक विकासासाठी घातक आहे. मात्र विविध ठिकाणी झालेल्या घटनांमुळे गुन्हेगारीचा आलेख वाढतच राहिला आहे.
किलज (ता. तुळजापूर) येथील अल्लाउद्दीन इनामदार यास सूनेच्या खूनप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा व पाच हजार रूपये दंड तसेच दंड न दिल्यास आणखी एक वर्षाची कैदाची शिक्षा अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायाधीश एम.बी. दाते यांनी ठोठावली. ही घटना दि. 17 जानेवारी 2011 रोजी घडल्याचे गंभीर जखमी हसीना इनुस इनामदार याने उस्मानाबाद रूग्णालयात औषधोपचार देताना दिले. नळदुर्ग पोलीसात गुन्हा दाखल झाला होता. सप्टेंबर महिन्यात जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. नळदुर्ग येथील ऐतिहासिक किल्ल्यात महेश यलाप्पा बडगेर (वय 19, रा. सोलापूर) या पर्यटकाचे पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना दि. 5 ऑगस्ट रोजी दुपारी घडली. इटकळ (ता. तुळजापूर) येथे चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी पतीनेच घरात पुरला पत्नीचे मृतदेह. अन्वरबी आयुब शेख (वय 33, रा. इटकळ) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून तर आयुब याकुब शेख (वय 37) असे आरोपी नव-याचे नाव आहे. ही घटना दि. 9 ऑगस्ट रोजी घडली व 13 ऑगस्ट रोजी उघडकीस आली. तुळजापूरात शोभा हरिशचंद्र शिंदे (वय 35) या महिलेचा खून दि. 3 जुलै रोजी झाल्याचे उघडकीस आले. आरोपी बाळासाहेब वसंत काळभोर (वय 40, रा. लोणी काळभोर, जि. पुणे) यास पोलीसांनी अटक केली. सिंदगाव (ता. तुळजापूर) येथे शेतीच्या वादातून शरणाप्पा विश्वनाथ पाटील (वय 48) या शेतक-याचा खून चौघांनी मंगळवार दि. 6 नोव्हेंबर रोजी सायंकाळी केला. याप्रकरणी चौघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दि. 11 नोव्हेंबर रोजी विषारी भोजन करून शामराव रखबाजी बनसोडे (वय 85 वर्षे), दिगंबर विश्वंभर पाटील (वय 65 वर्षे) दोघे रा. बसवंतवाडी, ता. तुळजापूर हे मृत्यूमुखी पडले. याप्रकरणी तर प्रमोदकुमार बोबडे व प्रभावती प्रमोदकुमार बोबडे या दांम्पत्याविरूद्ध खुनाचा दाखल करून प्रभावती बोबडे या महिलेस पोलीसानी अटक केली. प्लॉट खरेदीच्या रजिष्टरी करण्यासाठी बँकेतून काढलेले 27 लाख रूपयेची रोकड स्कार्पिओ कारमधून अज्ञात चोरटयानी चोरून नेल्याची घटना शुक्रवार दि. 23 नोव्हेंबर रोजी सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या दरम्यान कळंब येथील दत्तनगर येथे घडली. कोकरवाडी (ता. परंडा) येथे दि. 25 ऑगस्ट रोजी रात्री अवैध पेट्रोल साठ्याचा स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेत इंदिराबाई देवराज कदम (वय 60), मुलगा भैय्या (7), सिताराम कदम (वय 45) हे तिघेजण ठार झाले. दि. 17 ऑगस्ट रोजी अणदूर (ता. तुळजापूर) येथील यळकोटे कुटुंबातील आठजणांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना उघडकीस आली. दि. 31 जानेवारी रोजी येरमळा ता. कळंब येथे मोका अंतर्गत गुन्हा दाखल झालेल्या आरोपीला अटक करण्यास गेलेल्या पोलीस निरीक्षक राजेंद्र मातोळे यांच्या अंगावर रॉकेल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न जमावाने केला. या घटनेने जिल्ह्यातील पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली होती. दि. 17 जानेवारी रोजी बोरी (ता. तुळजापूर) गावाजवळ असलेल्या एका ढाब्यावर सशस्त्र दरोडेखोरांच्या टोळीने केलेल्या हल्ल्यात शामराव भाऊसाहेब पाटील (वय 54) याचा मृत्यू झाला तर तिघेजण जखमी झाले.
दि. 8 डिसेंबर रोजी सायंकाळी साडे सहा वाजता आंध्रप्रदेशातून गुजरातकडेबेकायदेशीर गुटख्याची चोरटी वाहतूक करीत असताना पोलीसानी राष्ट्रीय महामार्गावरील जळकोट (ता. तुळजापूर) शिवारात सुमारे साडे सहा लाख रूपये किंमतीचा गुटखा जप्त केला आहे. यावेळी गुटखा वाहतूक करणा-या एका व्यक्तीसह टाटा टेम्पो पोलीसानी जप्त केले. उस्मानाबाद जिल्ह्यात 13 लाख 50 हजार रूपयाचा गुटखा जप्त, तामलवाडी (ता. तुळजापूर) परिसरातील कदमवाडी शिवारात पोलीसानी छापा मारून गुटखांचा साठा जप्त करून अन्न व औषध विभागाच्या स्वाधीन केला. उस्मानाबाद पोलीसांनी उस्मानाबाद, औरंगाबाद, हिंगोली, जालना, रत्नागिरी, जळगाव, बीड व सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील अनेक बँकावर दरोडा टाकणा-या दरोडेखोराला एप्रिल महिन्याअखेरीस पकडले. दि. 24 मार्च रोजी उस्मानाबाद बसस्थानकावर बसमध्ये चढणा-या एका वृध्द शेतक-याच्या बॅगेत असलेल्या 5 लाख 72 हजार रूपयाची रोकड लंपास केली. दि. 7 फेब्रुवारी रोजी उस्मानाबाद येथील शासकीय रूग्णालयावरून अलकनंदा ज्ञानेश्वर बामणकर (वय 30, रा. बामणी) या रूग्ण महिलेने उडी मारून आत्महत्या केली. दि. 4 फेब्रुवारी रोजी पहाटेच्यावेळी नळदुर्ग येथे बसस्थानकासमोर विविध वृत्तपत्र, पान स्टॉल व बेकरीच्या दुकानास भीषण आग लागून 3 लाखाचे नुकसान झाले. शनिवार दि. 11 फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयास अचानक आग लागून कार्यालयातील महत्त्वाचे दस्ताऐवज व कादगपत्रे नष्ट झाली. दि. 3 नोव्हेंबर रोजी येडोळा (ता. तुळजापूर) येथे विष मिश्रित पेंड खाल्याने पंधरा पेक्षा अधिक शेळ्या व दोन म्हैशी मृत्यूमुखी पडल्या. दि. 28 नोव्हेंबर रोजी तुळजापूरात विजेचा शॉक लागून सखुबाई मलप्पा पानेगर (वय 45, रा. गुलबर्गा), शिंवलिंगप्पा शिवशरण सालोटगी (वय 22, रा. नेवनूर, ता. जेवरगी, जि. गुलबर्गा) या दोन भाविकांचा मृत्यू झाला. दि. 3 फेबुवारी रोजी दरोडा टाकण्याच्या तयारीतील पाचजणांना मुर्टा (ता. तुळजापूर) पाटी ते मुर्टा गावादरम्यान पोलीसानी पाठलाग करून पकडले. दि. 9 ऑगस्ट रोजी तुळजापूर, अक्कलकोट तालुक्यातील अनेक गावात प्रचंड मोठ्या स्फोटकाचे आवाज झाल्याने ग्रामस्थांत भितीची वातावरण पसरले होते.
उस्मानाबाद येथील वैराग रोड परिसरात राहणा-या सिंधुबाई सुधाकर सुरवसे याना तीन वर्षापूर्वी प्रशांत पांडुरंग देवकते, रेखा पांडुरंग देवकते, लक्ष्मी पांडुरंग देवकते या तिघांनी मारहाण केल्याची फिर्याद सिंधुबाई सुरवसे यांनी दिली होती. याप्रकरणी न्यायदंडाधिकारी एस.पी.राचकर यांच्या समोर सुनावणी होऊन तिन्ही आरोपींना एक वर्ष सक्तमजुरी व साडे सात हजार रूपयाची शिक्षा दि. 8 ऑगस्टपूर्पी सुनावली.
सरत्या वर्षात जिल्ह्यात गुन्हेगारी व अपघातांच्या घटनांचा आलेख असा चढताच राहिल्याचे यावरुन स्पष्ट होते.