सोलापूर : वने, पुनर्वसन व मदतकार्य आणि भूकंप पुनर्वसन मंत्री ना. पतंगराव कदम हे सोलापूर जिल्हयाच्या दौ-यावर येत असून त्यांच्या दौ-याचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
       शनिवार दिनांक 29 डिसेंबर रोजी सकाळी 7 वाजता मुंबई येथून सिध्देश्चवर एक्सप्रेसने सोलापूर रेल्वे स्थानक येथे आगमन व शासकीय वाहनाने शासकीय विश्रामगृह सोलापूरकडे प्रयाण. सकाळी 7.15 वाजता शासकीय विश्रामगृह सोलापूर येथे आगमन व राखीव. सकाळी 11 ते दुपारी 1.30 वाजता महामहीम राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचेसमवेत विविध कार्यक्रमांना उपस्थिती. ( निर्मलकुमार फडकूले भवन उदघाटन सोलापूर, अश्विनी ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्राचे उदघाटन (स्थळ- कुंभारी, ता. दक्षिण सोलापूर), दुपारी 2 वाजता इंटरसिटी एक्सप्रेसने पुणेकडे प्रयाण.

पदुम मंत्री ना. मधुकरराव चव्हाण  यांचा सोलापूर जिल्हा दौरा
सोलापूर :- पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री ना. मधुकरराव चव्हाण  हे सोलापूर जिल्हा दौ-यावर येत असून त्यांच्या दौ-यातील कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे -
         मंगळवार दि.  25 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता अणदूर येथून शासकीय वाहनाने सोलापूर येथे आगमन व कै. बाबुराव चन्नप्पा चाकोते जयंती निमित्त कृषी, औद्योगिक, सामाजिक, क्रीडा, संगित इत्यादी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केलेल्या ज्येष्ठ व श्रेष्ठ व्यक्तींचा गौरव व पुरस्कार कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ- कै. वि.गु.शिवदारे सभागृह, कृषी उत्पन्न बाजार समिती, सोलापूर)  दुपारी 12 वाजता सोलापूर येथून शासकीय वाहनाने अणदूर   ता.  तुळजापूरकडे प्रयाण.  सायंकाळी 7.30 वाजता अणदूर ता. तुळजापूर येथून शासकीय वाहनाने शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथे आगमन व राखीव. रात्रौ 10.45 वाजता सोलापूर येथून सिध्देश्वर एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.    

 
जलसंपदा मंत्री सुनिल तटकरे सोलापूर जिल्हा दौ-यावर 
सोलापूर : जलसंपदा मंत्री (कृखोपाम वगळून) सुनिल तटकरे हे सोलापूर जिल्हयाच्या दौ-यावर येत असून त्यांच्या दौ-याचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
        बुधवार दि. 26 डिसेंबर 2012 रोजी रात्री 8.30 वाजता फलटण येथून मोटारीने शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथे आगमन व मुक्काम.
         गुरुवार दि. 27 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता सोलापूर येथून मोटारीने तुळजापूर जि. उस्मानाबादकडे प्रयाण.  दुपारी 4 वाजता तुळजापूर येथून मोटारीने अक्कलकोट येथे आगमन व राखीव. दुपारी 4 ते 5 वाजेपर्यंत श्री स्वामी समर्थ महाराज यांचे दर्शन. सायंकाळी 5 वाजता अक्कलकोट येथून मोटारीने सोलापूरकडे प्रयाण. सायंकाळी 6 वाजता शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथे आगमन व मुक्काम.
      शुक्रवार दि.  28 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता सोलापूर येथून मोटारीने पंढरपूरकडे प्रयाण. दुपारी 12 वाजता शासकीय विश्रामगृह, पंढरपूर येथे आगमन व राखीव. दुपारी 12.30 ते 1.30 वाजता श्री विठ्ठल रुक्मीणी मंदिर दर्शन. दुपारी 1.30 ते 3 वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह, पंढरपूर येथे राखीव. दुपारी 3 वाजता पंढरपूर येथून मोटारीने बारामती जि. पुणेकडे प्रयाण.
 
Top