सोलापूर :- जिल्हा पुरवठा कार्यालय आणि अन्नधान्य वितरण कार्यालयाच्या वतीने आज राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला.
    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अप्पर जिल्हाधिकारी अशोक काकडे तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्राहक पंचायतच्या जिल्हा महिला प्रमुख शोभना सागर उपस्थित होत्या.
    यावेळी श्रीमती सागर यांनी ग्राहकांची हक्क व कर्तव्ये या विषयावर प्रबोधनपर व्याख्यान दिले. तर अध्यक्षीय भाषणात श्री. काकडे यांनी ग्राहकांनी जागृत राहून शोषणाविरुध्द सामुहिकरित्या आवाज उठविला पाहिजे, असे आवाहन केले.
    रंगभवनजवळील राजस्व हॉलमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात विविध विभागांनी उभारलेल्या प्रदर्शन स्टॉल्सचे उद्घाटन श्री. काकडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास अन्नधान्य वितरण अधिकारी प्रमोद गायकवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भडकुंबे यांच्यासह विविध विभागांचे कर्मचारी, व्यापारी व नागरिक उपस्थित होते.
 
Top