उस्मानाबाद -: ग्राहक संरक्षणाचे सर्वत्र जागृती व्हावी, ग्राहक व व्यापारी यांच्यात विश्वास निर्माण होण्यासाठी दरवर्षी 24 डिसेंबर हा दिवस ग्राहक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्या निमित्ताने जिल्ह्यातील ग्राहकांसाठी मार्गदर्शन, चर्चासत्र व प्रदर्शन येथील महसूल भवन, तहसील कार्यालय, उस्मानाबाद दि. 29 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता आयोजित केले आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन जिल्हाधिकारी डॉ.के.एम.नागरगोजे हे करणार असून अध्यक्षस्थानी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच अध्यक्षा शशिकला पाटील राहणार आहेत. प्रमुख पाहूणे म्हणून महाराष्ट्र ग्राहक पंचायतचे विभाग संघटक प्रमोद कुलकर्णी हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी राम मिराशे आणि उपविभागीय अधिकारी प्रशांत सुर्यवंशी यांनी केले आहे