परंडा -: एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने व रोकड असे मिळून एकूण 35 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल लांबविल्याची घटना दि. 29 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री परंडा तालुक्यातील लोहारा येथे घडली आहे. याप्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोहारा येथील शिवाजी लिंबाजी देशमुख हे गुरुवारी घराला कुलूप लावून कुटुंबासह घराबाहेर झोपले होते. दरम्यान, अज्ञात चोरट्यानी मध्यरात्रीच्या सुमारास घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील सोन्याची फुले, झुबे, गंठन, चांदीचा करंडा व 15 हजारांची रोकड असा एकूण 35 हजाराचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.