नळदुर्ग -: शहापूर (ता. तुळजापूर) येथे आडात कोसळल्याने एका इसमाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवार दि. 29 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजण्याच्याया सुमारास घडली. याप्रकरणी नळदुर्ग पोलिस ठाण्यात अकस्मात घटनेची नोंद करण्यात आली आहे.
दत्तू आण्णाप्पा इटकर (वय 45, रा. शहापूर, ता. तुळजापूर) असे मयताचे नाव आहे. दत्तू इटकर हे गुरूवारी सायंकाळच्या सुमारास गावातील आडाच्या कट्टयावर बसले होते. यावेळी त्यांचा तोल जाऊन ते आडात कोसळले. त्यामुळे पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हवालदार बजरंग सरपाळे हे करीत आहेत.