नळदुर्ग -: अणदूर (ता. तुळजापूर) येथील आयोजित हरिनाम सप्‍ताहाची सांगता बुधवार रोजी हभप रामकृष्‍ण तोंरबेकर यांच्‍या काल्‍याच्‍या किर्तनाने करण्‍यात आली. अणदूर येथील विठ्ठल मंदिरात महिला भजन मंडळाच्‍यावतीने 22 नोव्‍हेंबर पासून हरिनाम सप्‍ताह निमित्‍त सप्‍ताहभर विविध धार्मिक कार्यक्रम घेण्‍यात आले. बुधवारी टाळ, मृदंगाच्‍या गजरात माऊलींची भव्‍य दिंडी काढण्‍यात आली. त्‍यानंतर दुपारी हभप तोरंबेकर महाराज यांचे काल्‍याचे किर्तन झाले. त्‍यानंतर सर्व भाविकांना प्रसादाचे वाटप करण्‍यात आले. महानंदा पाटील, इंदूबाई परीट, राधाबाई तोतरे, मंगल भुरे, नानी मोकाशे, गोदाबाई स्‍वामी,   अयोध्‍या घुगे यासह महिला भजनी मंडळाच्‍या पदाधिका-यांनी सप्‍ताहच्‍या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.
 
Top