
सध्या महागाईने उच्चांकी गाठल्याने सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. त्याचबरोबर सर्वांचे मन राखण्यासाठी प्रसंगी कर्जबाजारी व्हावे लागते. बंजारा समाजानेही आधुनिकतेची कास धरत फुलवाडी येथे सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी बंजारा समाजातील नऊ जोडपे विवाहाच्या पवित्र बंधनात अडकले. त्यांना शुभाशिर्वाद देण्यासाठी परिसरातील नागरिकांसह राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी बंजारा सेलचे प्रदेश उपाध्यक्ष मोतीराम हिरा चव्हाण, बंजारा सेवा संघाचे सुरेश राठोड आदींची उपस्थिती होती. विवाह सोहळा यशस्वी करण्यासाठी सरपंच वसंत पवार, संजय हांडगे, हिरामण जाधव, मधुकर हजारे, सुभाष कुताळे, राम जाधव, फुलचंद जाधव, राजू जाधव आदींनी परिश्रम घेतले.