नळदुर्ग -: अचलेर (ता. लोहारा) येथील विद्याविकास विद्यालयातील विद्यार्थिनी प्रतिक्षा बायस व स्मिता बेडगे यांची सातारा येथे दि. 6 डिसेंबर रोजी होणा-या राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
पंचायत युवा क्रीडा व खेल अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने भिलवडी (जि. सांगली) येथे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत आचरलेच्या विद्याविकास विद्यालयातील प्रतिक्षा बायस व स्मिता बेडगे या विद्यार्थिनी खेळाडू सहभागी झाल्या होत्या. त्यांनी नेत्रदिपक खेळ सादर केले. त्यांनी केलेल्या कामगिरीमुळे दि. 6 डिसेंबर रोजी सातारा येथे होणा-या राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी या दोघींची निवड झाली आहे. त्यांच्या निवडीबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.एम. गुरव, पर्यवेक्षक यु.एन. पाटील, सरंपच पटणे, उपसरपंच सोलंकर, तालुका क्रीडा सचिव एन.व्ही. पाटील आदीनी अभिनंदन केले आहे. या खेळाडूंना क्रीडा विभागप्रमुख राठोड, क्रीडाशिक्षक विभुते, रमेश पुजारी यांचे मार्गदर्शन लाभले.