नागपूर -:
नागपूर कसोटीमध्ये भारताचा डाव अडचणीत आला आहे. जेम्स अॅंडरसनने गौतम गंभीरला बाद करुन भारताला चौथा धक्का दिला. गंभीर 37 धावांवर बाद झाला. एका बाजूने गंभीर स्थिरावलेला होता. एक मोठी खेळी करेल, अशी अपेक्षा होती. परंतु, खराब फटका खेळून तो बाद झाला. गंभीर बाद झाला त्यावेळी भारताची 4 बाद 71 अशी स्थिती होती. त्यानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहलीने इग्लंडला विकेट मिळू दिली नाही. दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी भारताची 4 बाद 87 अशी स्थिती होती. भारतीय संघ अजून 243 धावांनी पिछाडीवर आहे. सामना वाचविण्यासाठी भारताला पुन्हा शर्थीचे प्रयत्न करावे लागणार असून धोनी आणि कोहलीवरच सर्व मदार आहे.
जेम्स अॅंडरसनने सचिन तेंडुलकरचा पुन्हा एकदा त्रिफळा उडविला. सचिन अवघ्या 2 धावा काढून परतला. सचिन बाद झाल्यामुळे भारताचा डाव अडचणीत आला आहे. अॅंडरसनने सचिनला 9 वेळा बाद केले. सचिनला सर्वाधिक वेळा त्यानेच बाद केले आहे.
जेम्स अॅंडरसनने सचिन तेंडुलकरचा पुन्हा एकदा त्रिफळा उडविला. सचिन अवघ्या 2 धावा काढून परतला. सचिन बाद झाल्यामुळे भारताचा डाव अडचणीत आला आहे. अॅंडरसनने सचिनला 9 वेळा बाद केले. सचिनला सर्वाधिक वेळा त्यानेच बाद केले आहे.
इग्लंडला 330 धावांवर रोखल्यानंतर भारतीय डावाची सुरुवात निराशाजनक झाली. विरेंद्र सेहवागचा पहिल्याच षटकात जेम्स एंडरसनने शून्यावर त्रिफळा उडविला. त्यानंतर गौतम गंभीर आणि चेतेश्वर पुजाराने डाव सावरला. परंतु, चहापानानंतर गॅहम स्वानने पुजाराला बाद केले. इयन बेलने फॉरवर्ड शॉर्टलेगवर अप्रतिम झेल घेतला. मात्र, चेडू पुजाराच्या हाताला लागून गेलेला टीव्ही रिप्लेमध्ये दिसला. त्यामुळे पुजारा कमनशीबी ठरला. दोघांनीही संयम राखत अर्धशतकी भागीदारी करुन इग्लंडच्या गोलंदाजांना प्रत्युत्तर दिले. पुजारा 26 धावा काढून बाद झाला.