उस्मानाबाद -: जिल्हा परिषदेकडील जुन्या वाहनांचे जाहीर लिलाव दिनांक 9 जानेवारी 2013 रोजी सकाळी  11 वाजता जिल्हा परिषद कार्यशाळा, उस्मानाबाद येथे करावयाची आहेत. तसेच त्याच दिवशी अनामत रक्कम सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत रोख स्वरुपात भरुन घेण्यात येईल.
      तरी लिलावात भाग घेऊ इच्छिणाऱ्या बोलीदारांनी जिल्हा परिषद कार्यशाळा उस्मानाबाद येथे दिलेल्या तारखेस वेळेवर उपस्थित रहावे, सर्व वाहने जिल्हा परिषद कार्यशाळेत कार्यालयानी वेळेत पहावयास मिळतील. लिलावाच्या अटी व शर्ती कार्यशाळेत नोटीस बोर्डावर लावण्यात आल्या आहेत. तसेच मागणी केल्यास अटी व शर्तीची प्रत विनामुल्य देण्यात येईल. वाहनाचा तपशील- जीप क्रमांक एम एच 25/ ए-392 महिंद्रा अँन्ड महिंद्रा, वाहन खरीदीचे वर्ष- 1999, जीप क्रमांक एम.एच.25/6176 महिंद्रा ॲन्ड महिंद्रा, 2001 आहे.       

माजी सैनिकांच्या पाल्यांना सिक्युरीटी कोर्स बाबत आवाहन  
 उस्मानाबाद -: जिल्हयातील सर्व माजी सैनिक / विधवा व इतर उमेदवारांना सूचित करण्यात  येते की. महासैनिक ट्रेनिंग सेंटर, कोल्हापुर येथे सिक्युरीटी कोर्स दिनांक 12 जानेवारी ते 5 फेब्रुवारी 2013, 9 फेब्रुवारी  ते 4 मार्च, 9 मार्च, ते  एक एप्रिल, सहा एप्रिल ते 29एप्रिल, 8 जुन  ते एक जुलै या कालावधीत चालणार आहेत. तसेच प्रि रिक्रुटमेंट ट्रेनिंग कोर्स - दिनांक 3 मे ते 1 जुन  या कालावधीत चालणार आहेत. तसेच त्यासाठी फिस अनुक्रमे 4 हजार 800  व 6 हजार रुपये इतकी भरावी लागणार आहे. तरी इच्छुक सर्व माजी सैनिक व त्यांच्या पाल्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, उस्मानाबाद यांनी केले आहे.

घाटेअळी नियंत्रणासाठी कृषी विभागाचा सल्ला
उस्मानाबाद -:  कृषी विभागामार्फत राबविण्यात येणा-या पिकावरील किडरोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्पांतर्गत  उस्मानाबाद तालुक्यातील हरभरा पिकाचे सर्वेक्षण केले असता हरभरा या पीकांवर  घाटेअळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. घाटेअळीच्या नियंत्रसाठी शेतक-यांनी हरभरा 50 टक्के फुलो-यात असताना घाटेअळीच्या नियंत्रणासाठी असाफेट 75 टक्के  1 मी.लीटर पाण्यात तसेच   1 टक्का गूळ मिसळून फवारावे. तसेच प्रती हेक्टरी 50 पक्षीथांबे उभारावे, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी,उस्मानाबाद  यांनी केले आहे.

अनुकंपा नोकरी यादीबाबत 31 डिसेंबरपर्यत आक्षेप पाठवा 
उस्मानाबाद -: अनुकंपा तत्वावर नोव्हेंबर 2012 अखेर जेष्ठता यादी जिल्हा सुचना व विज्ञान केंद्र ( एन. आय. सी. ) उस्मानाबाद या http:// osmanabad.nic.in /newsite/ govdepartments/Z.P.htm या संकेतस्थळावर व जिल्हा परिषेद नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
      कोणाचे कांही आक्षेप असतील त्यांनी  दिनांक 31 डिसेंबर 2012 पर्यंत आवश्यक त्या कागदपत्रासह सामान्य प्रशासन विभाग येथे सादर करवेत. मुदतीनंतर आलेल्या आक्षेपांचा विचार करण्यात येणार नाही. असे मुख्य नियंत्रण माहिती व प्रसिध्दी कक्ष तथा उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा) जिल्हा परिषद,  उस्मानाबाद यांनी कळविले आहे.   
 
Top