मुंबई -: महाराष्ट्रातील वयोवृध्द खेळाडूंना मानधन देण्याबाबतच्या योजनेसाठी  महाराष्ट्र केसरी व अर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडूंना यापुढे वयाची व उत्पन्नाची अट लागू होणार नाही, अशी माहिती क्रीडा व युवककल्याण मंत्री पद्माकर वळवी यांनी दिली.
    महाराष्ट्रातील वयोवृध्द महिला किंवा पुरुष खेळाडूंना मानधन देण्याबाबतच्या नियमानुसार अर्जदार महिला किंवा पुरुष खेळाडूंचे वय अर्ज करण्याच्या दिनांकास 50 वर्षापेक्षा जास्त असावे. तसेच त्याचे सर्व मार्गांनी मिळणारे वार्षिक उत्पन्न 40 हजार रुपयांपेक्षा कमी असावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
     हिंद केसरी, रुस्तमे-हिंद, महान भारत व भारत केसरी किताब मिळवणा-या कुस्तीगिरांच्या बाबतीत वयाची व उत्पन्नाची अट यापुर्वीच शिथिल करण्यात आली आहे. त्यामध्ये महाराष्ट्र केसरी व अर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडूंचा समावेश नव्हता. त्यामुळे महाराष्ट्र केसरी व अर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडूंच्या बाबतीतही वयाची व उत्पन्नाची अट शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती श्री. वळवी यांनी दिली.
    याबाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक 201212211518079021 असा आहे.

 
Top