नळदुर्ग -: मुंबई दादर येथील इंदू मिलची संपूर्ण साडे बारा एकर जागा ही भारतरत्‍न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या स्‍मारकाकरीता महाराष्‍ट्र शासनकाडे हस्‍तांतरीत करण्‍याचा केंद्र सरकारने घेतलेल्‍या निर्णयाचे रिपाइं सह आंबडेकर प्रेमी जनतेनी नळदुर्ग येथे फटाक्‍याची जोरदार आतषबाजी करून व पेढे वाटून निळ्या गुलालाची मुक्‍त उधळण करीत आनंदोत्‍सव साजरा केला.
    गेल्‍या अनेक दिवसापासून बहुचर्चेत असलेला इंदूमिल जागेच्‍या हस्‍तांतरच्‍या प्रश्‍नांवर चालू हिवाळी अधिवेशनात केंद्र सरकारने चर्चेला घेऊन अखेर इंदू मिल संपूर्ण साडे बारा एकर जागा ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या आंतराष्‍ट्रीय स्‍मारकाकरीता महाराष्‍ट्र सरकारकडे हस्‍तांतरीत करण्‍याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे ग्रामीण व शहरी भागात आंबेडकरी जनतेकडून मोठ्याप्रमाणात स्‍वागत हो तअसून जागेच हस्‍तांतरण निर्णयाची बातमी कळताच नळदुर्ग येथे राष्‍ट्रीय महामार्ग क्रमांक नऊवर बसस्‍थानकासमोर रिपाइंचे जिल्‍हाध्‍यक्ष दुर्वास बनसोडे, तुळजापूर तालुकाध्‍यक्ष एस.के. गायकवाड, नळदुर्ग शहराध्‍यक्ष बाबासाहेब बनसोडे सह कार्यकर्त्‍यांनी जोरदार घोषण देऊन फटाक्‍याची आतिषबाजी करून पेढे वाटून व गुलालाची उधळण करीत आनंदोत्‍सव साजरा केला.
    यावेळी महादेव वाघमारे, सुभाष गवळी, प्रकाश लोखंडे, बी.एम. सुरवसे, देवानंद दुपारगुडे, सुरेश थोरात, नामदेव बंजारे सह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी रिपाइंचे तालुकाध्‍यक्ष एस.के. गायकवाड म्‍हणाले की, केंद्र सरकारने घेतलेला निर्णय अभिनंदनिय असून लवकरात लवकर स्‍मारच्‍या बांधकामाला सुरूवात करावी.
 
Top