नळदुर्ग -: तिरट नावाचा जुगार खेळत असताना पोलीसानी अचानक छापा मारून सुमारे साडे सात हजार रूपयाचा मुद्देमाल हस्तगत करून सहा जुगा-याना ताब्यात घेतले आहे. ही घटना जळकोट (ता. तुळजापूर) येथे घडली.
प्रतिपाल बलभीम सदाफुले (३७ वर्षे), विजयकुमार खंडेराव इंगळे (वय ३२), (दोघे रा. अणदूर, ता. तुळजापूर) शिवराज काशीनाथ सोन्ने (२३ वर्षे), दिनकर प्रभाकर सुरवसे (२६ वर्षे), दोघे रा.जळकोट, जुल्फेकार रफीक पटेल (५५ वर्षे, रा. नळदुर्ग), औराज शिवलिंगप्पा इटकळे (५६ वर्षे, रा. आरबळी, ता. तुळजापूर) असे जुगार खेळताना पोलीसानी ताब्यात घेतलेल्यांचे नावे आहेत. वरील सर्वजण जळकोट (ता. तुळजापूर) येथील गोविंद चुंगे यांच्या वखारीच्या बाजुला बेकायदेशीररित्या तिरट नावाचा जुगार खेळत होते. याची गुप्त माहिती नळदुर्ग पोलीसाना मिळताच हवालदार बब्रुवान घोडके, सुधाकर माडजे, संजय सुरवसे, गोपाळ घारगे यानी घटनास्थळी छापा टाकून वरील सहा आरोपींना रंगेहाथ पकडले. पोलीसानी त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असे मिळून सुमारे 7 हजार 580 रूपयाचा मुद्देमाल जप्त केला. गोपाळ नवनाथ घारगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार बब्रुवान घोडके हे करीत आहेत.