कळंब -: येथील प्राध्‍यापक गोकुळ घोलप यांचा मुलगा सुजित घोलप याची मद्रास येथील आयआयटी महाविद्यालयात झालेल्‍या कॅम्‍पस इंटरव्‍यूव्‍हमधून अ‍मेरिकेतील गुगल कंपनीमध्‍ये निवड झाली आहे. गुगल ही जगातील संगणक व इंटरनेट क्षेत्रातील कंपनी असून सुजित घोलप याच्‍या निवडीबद्दल त्‍याचे अभिनंदन होत आहे.
    सुजित घोलप हा मद्रास येथील 'आयआयटी' मध्‍ये संगणकशास्‍त्र शाखेतून अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. महाविद्यालयात सन 2011 मध्‍ये झालेल्‍या कॅम्‍पस इंटरव्‍यूव्‍ह मुलाखतीसाठी जगातील याहू, जी-मेल, व्‍हीएमडब्‍ल्‍यू, सॅमसंग, गोल्‍ड सॅच, गुगल, फेसबुक या कंपन्‍या आल्‍या होत्‍या. महाविद्यालयात या कंपन्‍यांच्‍या झालेल्‍या मुलाखतीसाठी 1 हजार 263 विद्यार्थ्‍यांची निवड झाली होती. त्‍यापैकी फक्‍त 200 विद्यार्थ्‍यांची विविध कंपन्‍यामध्‍ये निवड झाली आहे. विशेष बाब म्‍हणजे सुजित घोलप, नितीन मोदी या दोन संगणक तज्ञांनी 82 लाख रुपयांचे पॅकेज नाकारले आहे. आपल्‍या कामाच्‍या तुलनेत मिळणारे हे पॅकेज कमी असून सॅमसंग, फेसबुक या कंपन्‍याना नाकारुन सुजित घोलपे याने गुगल या कंपनीत काम करण्‍यास पसंती दिली आहे. एकाच दिवशी सुजित घोलप याची सहा बहुराष्‍ट्रीय कंपन्‍यानी निवड केली असताना त्‍याने अमेरिकेतील गुगल या कंपनीत काम करण्‍याचे ठरविले आहे. ऑक्‍टोबर 2013 मध्‍ये सुजित घोलप हा अमेरिकेत जाणार आहे.
    कळंब सारख्‍या ग्रामीण भागातील विद्यार्थी सुजित घोलप याने आयटी क्षेत्रात केलेल्‍या नेत्रदिपक कामगिरी व यशाबद्दल ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयातील प्रा. गोकुळ घोलप, प्राचार्य डॉ. अशोकराव मोहेकर, सौ. कौशल्‍या घोलप आदीनी सुजित घोलप याचे अभिनंदन केले आहे.
 
Top