नवी दिल्ली -: संसदेवर झालेल्या हल्ल्यातील मुख्य आरोपी अफजल गुरूची फाईल माझ्या टेबलवर आल्यानंतर मी 48 तासांत त्यावर निर्णय घेईन, असे छातीठोकपणे सांगणा-या केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या मंत्रालयातला अनागोंदी कारभार चव्हाटयावर आला आहे. शिंदे यानी ऑगस्टमध्ये सूत्रे हाती घेतली तेंव्हाच राष्ट्रपतीनी समिक्षेसाठी पाठवलेली अफजल गुरूच्या फाशीची फाईल अजूनही गृहमंत्रालयातल्या बाबूनी शिंदेपुढे ठेवलेली नाही.
मुंबई हल्ल्यातील पाकिस्तानी अतिरेकी अजमल कसाबला दि. 21 नोव्हेंबर रोजी फासावर लटकवण्यात आले. त्याचबरोबर मुंबईच्या आधी संसदेवर झालेल्या हल्ल्यातील आरोपी अफजल गुरूबाबत गृहमंत्र्यावर प्रश्नांचा भडीमार झाला. 2001 मध्ये संसदेवर हल्ला झाला. त्याला दहा वर्षे उलटून गेलीत तरीही या हल्ल्याचा गुन्हेगार फाशीची शिक्षा होऊनही फासापासून दुर का? असा सवाल विरोधकानी विचारला होता. तेव्हा सरकार कोणत्याही गुन्हेगाराच्या बाबतीत ढिलाई दाखवणार नाही. गुरूची फाईल माझ्या मंत्रालयात आलीय. ती माझ्यासमोर जेव्हा समोर येईल तेव्हा मी त्यावर 48 तासांत निर्णय घेईन, असे शिंदे यांनी सांगितले होते. मात्र त्यांच्याच मंत्रालयामुळे त्यांना याप्रश्नी तोंडघशी पडावे लागले आहे.
गुरूची फाईल अजून माझ्याकडे आलेली नाही, हेच उत्तर मंत्रालयातील बाबूंच्या कृपेने शिंदेना परत द्यावे लागले आहे. आतापर्यंत मी अर्जाची एकमेव फाईल बघितलीय ती अजमल कसाबची. त्यानंतर माझ्याकडे कोणाचीही याचिका आलेली नाही. अफजल गुरूची फाईल गृहमंत्रालयाकडे आली असली तरी अद्यापी तेथून ती माझ्यापर्यंत आलेली नाही. त्यामुळे त्यावर कधी निर्णय होणार हे सांगणे आताच शक्य नसल्याचे शिंदे म्हणाले.