सोलापूर -: सांगोला शहरात कायम स्वरुपी रास्त भाव धान्य दुकान सुरु करण्यात येणार आहे. शहारातील ज्या बचत गटांची धान्य दुकान परवाना चालविण्याची इच्छा असेल अशा बचत गटांनी दिनांक 1 ते 15 डिसेंबर या कालावधीत विहित नमुन्यात आपआपले अर्ज तहसीलदार, सांगोला यांच्या कार्यालयात मुदतीत व कार्यालयीन वेळेत जमा करावेत,
अर्जदाराने अर्ज स्वत: सादर करावा तसेच विहित नमुन्यातील अर्ज तहसीलदार सांगोला यांच्या कार्यालयात पाच रुपये भरुन मिळतील. रास्त भाव दुकान मंजूरीसाठी बचत गटाची निवड गुणानुक्रमे करण्यात येईल, याबाबतच्या अटी, नियम व शर्ती सांगोला तहसील कार्यालयामध्ये पहावयास मिळतील. शहारातील संबंधित बचत गटाने या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.