पंढरपूर :  पंढरपूर तालुका विधी सेवा समिती तर्फे आज रविवार दिनांक 2 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता दिवाणी न्यायालय, कनिष्ठ स्तर, नवी पेठ पंढरपूर येथे लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे.
या लोकन्यायालयामध्ये मोटार वाहन अपघात दावे,भारतीय चलन दस्त ऐवज कायदा कलम 138 आदी  प्रकरणे  निकालात काढण्यात येणार आहेत.या कार्यक्रमास पंढरपूर बार असोसिएशन पदाधिकारी, सदस्य व विधिज्ञ यांनी मोठया  संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन तालुका विधी सेवा समितीच्या अध्यक्षांनी एका पत्रकान्वये केले आहे  


 
Top