उमरगा -: येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयात शिक्षणमहर्षी तात्यारावजी मोरे आंतरमहाविद्यालयीन वाद-विवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
शहरातील छत्रपती शिवाजी महाविद्यालयात शिक्षणमहर्षि तात्यारावजी मोरे आंतर महाविद्यालयीन वाद-विवाद स्पर्धा शनिवार दि. २९ डिसेंबर रोजी ‘थेट परकिय गुंतवणूक देशाला तारक की तारक’ या विषयावर आयोजीत करण्यात आली आहे. या वाद विवाद स्पर्धेत उस्मानाबाद, बीड, लातूर व सोलापूर या जिल्ह्यातील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील स्पर्धक सहभागी होवू शकतील. या स्पर्धेत अनुकूल आणि प्रतिकूल बाजूने स्पर्धकांना आपले मत मांडता येईल. या स्पर्धेसाठी प्रथम सांघिक पारितोषिक रु. २५०१ रु. फिरती ढाल आणि प्रमाणपत्र, द्वितीय सांघिक पारितोषिक रु. २००१ व प्रमाणपत्र आणि उत्तेजनार्थ प्रथम वैयक्तीक पारितोषिक रु. १००१ आणि प्रमाणपत्र तर उत्तेजनार्थ द्वितीय वैयक्तीक पारितोषिक ५०१ आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त महाविद्यालयाने आपल्या संघाची नोंदणी बुधवार दि. २६ डिसेंबर पर्यंत सहभाग नोंदविण्याचे आवाहन महाविद्यालचे प्राचार्य डॉ.एम. डी. शिंदे, उपप्राचार्य डॉ. डी.एस. बिराजदार, डॉ. एस. एन. अस्वले, डॉ.एस.आर.बिराजदार, प्रा. व्ही. टी. जगताप, प्रा. एस. एन. मुच्छटे, प्रा. एन. डी. साळूंके, डॉ. एम. एस. निर्मळे, प्रा. गाडेकर, प्रा. तोडकर यांनी केले आहे. उस्मानाबाद : शहरामध्ये प्रवाशी वाहतुक करताना रिक्षा चालकांना पोलिस प्रशासनाचा नाहक जाचास सामोरे जावे लागत आहे.