उस्मानाबाद -: महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने सन 2011 -12 चे जिल्हा व तालुका स्तरीय बँकर्स इन्सेन्टीव्ह पुरस्काराचे वितरण आज येथे करण्यात आले. यावेळी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी तथा ग्राम स्वच्छता अभियानाचे जिल्हा समन्वयक डॉ.आर.आर.चंदेल, नाबार्डचे सहायक महाप्रबंधक तथा बँकर्स इन्सेंटिव्हचे विशेष समिती सदस्य सी.डी.देशपांडे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यु.पी. बिरादार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक डॉ.केशव सांगळे, भारतीय स्टेट बँक आरसीटीचे संचालक  युवराज  गवळी, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी तथा बँकर्स इन्सेंटिव्ह विशेष समितीचे  सदस्य सचिव एम.ए.भादुले यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
         यावेळी  जिल्हास्तीय -1 व तालुकास्तीय -6 अशा 7 बँकेची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार–भारतीय स्टेट बँक शाखा-पंरडा यांना तर तालुकास्तीय पुरस्कार भारतीय स्टेट बँक, शाखा-उस्मानाबाद, बँक ऑफ महाराष्ट्र शाखा-तामलवाडी, ता. तुळजापूर, भारतीय स्टेट बँक ,शाखा-आष्टाकासार,ता.लोहारा, महाराष्ट्र ग्रामीण बँक,शाखा-गुंजोटी ता.उमरगा, भारतीय स्टेट बँक शाखा-सोनारी ता. परंडा, महाराष्ट्र गा्रमीण बँक शाखा-शिराढोण ता. कळंब या संबंधित बँकेच्या शाखा व्यवस्थापक व प्रतिनिधींनी हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते स्विकारला. बँकांनी केलेल्या बचतगटांना वाटप केलेल्या कर्जाच्या अनुषंगाने बँकाचे मनोधर्य उंचाविण्यासाठी असे  पुरस्कार देण्यात येतात.
        यावेळी देशपांडे यांनी महिलांच्या अडचणी  सोडविण्यासाठी व त्यांना कर्ज मंजूर करण्यासाठी बचतगटांना वार ठरवून देणे व त्यांची प्रकरणी तातडीने निकाली काढण्याची सूचना केली. तसेच त्यांनी चालू आर्थीक वर्षातील वार्षीक उदिष्ट पूर्तीसाठीही प्रयत्न करावेत,असेही त्यांनी सांगितले.
श्री.चंदेल यांनी, बँका चांगले काम करतात म्हणून त्यांना हा पुरस्कार देण्यात येतो ही बाब आनंदनीय आहे, असे सांगितले. बँकानी महिला बचतगटातील प्रलंबित कर्ज प्रकरणे समन्वयाने सोडवावीत. महिला बचतगटांनी बँकांनी काढलेल्या त्रुटीबाबत सातत्याने पाठपुरावा करुन कर्ज प्रकरणे मंजूर घ्यावीत  आणि बचतगटांचया माध्यमातून  आर्थिक उन्नती साधावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.  यावेळी  डॉ. सांगळे, गवळी, बिरादार यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. 
       उस्मानाबाद लोकसंचलित साधन केंद्राच्या अध्यक्षा श्रीमती चारशिला पाटील, उमरगा (कदेर)  साधन केंद्राच्या अध्यक्षा वंदना पाटील,साधन केंद्र ढोकीच्या अधक्षा श्रीमती चव्हाण आणि परंडा येथील साधन केंद्राच्या अध्यक्षा श्रीमती मिरा शहाजी कोळी यांनी मनोगत मांडले.
         कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात भादूले यांनी  तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्यक्रमातील मायक्रो फायनान्स या घटकातंर्गत ग्रामीण महिला बचत गटांना विविध उद्योग व्यवसाय व शेती विकासाकरिता जिल्ह्यातील बँकानी महिला बचतगटांना कर्जाच्या रुपात अर्थ सहाय करुन लघु उद्योगास चालना दिली. गेल्यावर्षी 1 कोटी 83 लाख रुपये रक्क्म बँक कर्जाच्या माध्यमातून प्राप्त झाली त्याचाच एक भाग म्हणून 2011-12 या वर्षात जवळपास 871 महिलांनी शेती व बिगर शेतीवर आधिरित उद्योग सुरु केले. या पुढील काळातही बँकाच्या सहाय्याची आम्हाला आवश्यकता असून त्यांनी जास्तीत जास्त बचतगटांना अर्थसहाय उपलब्ध करुन दिल्यास  महिला सक्षमीकरणास मदत होईल, असे सांगितले. 
         कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सहायक समन्वय अधिकारी श्री.चव्हाण यांनी केले. या कार्यक्रमास निर्मल ग्रामअभियान कक्षाचे संवादतज्ज्ञ रमाकांत गायकवाड, मारुती राऊत, बँकेचे अधिकारी, कर्मचारी, बचतगटातील  महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.
 
Top