उस्मानाबाद : हतीरोग नियंत्रण मोहीम यावर्षी राबविण्यात येणार असून डी.ई.सी. या गोळया हत्ती रोग होऊ नये म्हणून आरोग्य कर्मचाऱ्या समक्ष नागरिकांना दिल्या जातात. हा उपक्रम यशस्वीपण राबवण्यिासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी ज्ञानोबा फुलारी यांनी केले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या हत्तीरोग नियंत्रण बैठकीत (दि.20डिसेंबर रोजी) बोलतांना त्यांनी केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हश्मी, डॉ. चिंछूरे, हिवताप अधिकारी जी.ए.कडगंजे उपस्थित होते.
या बैठकीत मार्गदर्शन करतांना हत्ती रोग हा क्युलेक्स डासाच्या मादीमुळे होतो. या रोगाचा प्रसार एका व्यक्तीकडून दुस-या व्यक्तीस मादी डास चावल्याने होतो. याची लक्षणे प्रथम अंगावर पुरळ येणे, खाज येणे, थंडी वाजून येणे, ताप येणे, अंगाच्या विविध भागात वेदना होणे, हातापायावर सुज येणे अशी लक्षणे असतात. यापासून बचाव करण्यासाठी हत्तीरोग मोहिमेत येणा-या आरोग्य कर्मचाऱ्यांकडून दिलेल्या गोळया खाऊन त्यांना सर्वतोपरी नागरिकानी सहकार्य करण्याचेही आवाहन या बैठकीत केले.