उस्मानाबाद :- श्री तुळजाभवानी जिल्हा क्रीडा समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. त्याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ.के.एम.नागरगोजे यांनी श्री तुळजाभवानी क्रीडा संकुलातील होत असलेली विविध कामे दर्जेदार व वेळत पुर्ण करावीत, अशा सुचना संबंधित अधिक-यांना दिल्या.
या बैठकीत जिल्ह्यातील क्रीडा प्रेमीसोबत विविध विषय व निवेदनावर चर्चा झाली.या संकुलामार्फत नेमावलीचे पालन करुन खेळाडूंना सर्वतोपरी सुविधा देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. तसेच खेळाडूंच्या राहण्याची सोय, सहित्य, साफ सफाई व विद्यूत प्रकाश जलतरण तलाव आदी विषयावरही चर्चा करण्यात आली. या प्रसगी जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. देशपांडे, जिल्हा क्रीडा अधिकारी अनिल देशपांडे, उपशिक्षणाधिकारी शिवाजी जाधव व संबंधित अधिकारी व सदस्य क्रीडा प्रेमी उपस्थित होते.