उस्मानाबाद :- जागतिक अपंग दिनानिमित्त जिल्ह्यातील अपंग शाळा/कर्मशाळांतील अपंग मुला-मुलींच्या प्रवर्ग व वयोगटनिहाय विविध क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन दि.22 व 23 डिसेंबर रोजी श्री तुळजाभवानी स्टेडियम,उस्मानाबाद येथे करण्यात आले आहे. तरी या स्पर्धेमध्ये अस्तिव्यंग, मुकबधिर, मनोविकलांग व अंध या प्रवर्गाच्या एकूण 25 शाळा मधील 450 स्पर्धक सहभागी होणार आहेत. या स्पर्धेमधून प्रथम क्रमांकाने विजेत्या स्पर्धकाचे राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड केली जाणर आहे, असे जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांनी कळविले आहे.