* जिल्ह्यात विविध ठिकाणी अवैध दारूची जप्ती
उस्मानाबाद -: जिल्ह्यात विविध ठिकाणी पोलीसानी अचानक मारलेल्या छाप्यात सुमारे दीड हजाराची रूपयाची अवैध हातभट्टी दारू जप्त करण्यात आली. ही घटना दि. 1 डिसेंबर रोजी घडली असून याप्रकरणी तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहन सायबा कवठेकर (रा. गुंजोटी, ता. उमरगा), लक्ष्मण्ा गणा चव्हाण (रा. लोहगाव, ता. तुळजापूर), कमल आबा शिंदे (वय 30, रा. कमळेश्वरी पिंपळगाव, ता. वाशी) असे गुन्हा दाखल झालेल्यांचे नाव आहेत. यातील वाशी तालुक्यातील कमळेश्वरी पिंपळगाव येथे एक हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर गुंजोटी (ता. उमरगा) येथे 210 रूपये, लोहगाव (ता. तुळजापूर) येथे 220 रूपये असे मिळून सुमारे 1 हजार 4
30 रूपयाचा मुद्देमाल पोलीसानी हस्तगत केला. याप्रकरणी वरील तिघांविरूद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
* किरकोळ कारणावरून एकास वस्तराने मारल्याने एक गंभीर
कळंब -: किरकोळ कारणावरून वस्तराने मारुन एकास गंभीर जखमी केले. ही घटना कळंब येथील खाटीक गल्लीमध्ये गुरसाळे यांच्या दुकानासमोर दि. 30 नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी दोघांविरूद्ध पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लखन ईश्वर अजबकर, सतिश ईश्वर अजबकर (दोघे रा. कळंब) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. तर गणेश दिलीप पारेकर (वय 19, रा. कसबापेठ कळंब) असे जखमीचे नाव आहे. यातील सागर पारेकर याच्यासोबत का भांडता म्हणून सांगत असताना वरील लोकानी सागर हा गल्लीत मोठ्याने मोबाईल गाणे लावतो असे सांगून शिवीगाळ करुन गणेश पारेकर याना वस्तराने मारून गंभीर जखमी केले. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद गणेश पारेकर दि. 1 डिसेंबर रोजी कळंब पोलीसात दिली. पुढील तपास हवालदार क्षिरसागर करीत आहेत.