कोल्हापूर -: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी आकाश पाताळ एक करेन असा निर्धार शिवसेनेचे कार्यप्रमुख उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केला. श्री महालक्ष्मीचे दर्शन घेऊन कोल्हापुरातून आपण या राज्य दौ-याची सुरूवात केली असून हा राजकीय दौरा नसून केवळ माझ्याच कुटुंबियांना भेटण्यासाठी, त्यांना नमस्कार करण्यासाठी हा दौरा असल्याचे त्यांनी सांगितले.
दुपारी येथे आल्यानंतर विमानतळावरून ते थेट सौ. रश्मी यांच्यासह महालक्ष्मी दर्शनासाठी गेले. यानंतर दुपारी 3 नंतर त्यांचे येथील शाहू सांस्कृतिक मंदिरामध्ये आगमन झाले. याठिकाणी कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. प्रचंड घोषणाबाजीत उध्दव यांचे येथे स्वागत करण्यात आले. उध्दव म्हणाले एका दैवताचा मुलगा होण्याचं भाग्य मला मिळालं. म्हणूनच त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी ज्यांना मुंबईपर्यंत येता आलं नाही अशा सर्वांना नमस्कार करण्यासाठी मीच आता दु.ख गिळून घराबाहेर पडलो आहे. मी हताश झालेले बाळासाहेब कधीही पाहिले नाहीत. म्हणूनच केवळ अश्रू ढाळत बसण्यापेक्षा आता कामाला लागा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी सुभाष देसाई, आमदार विनायक राऊत, गजानन कीर्तीकर, खासदार शिवाजीराव पाटील आढळकर, नीलम गो-हे, अरविंद सावंत, आमदार विजय शिवतारे, पुरूषोत्तम बर्डे, दिवाकर रावते, अरूण दुधवाडकर यांच्यासह कोल्हापूर जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पवार, आमदार राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, डॉ. सुजित मिणचेकर उपस्थित होते.
* विधानसभेवर भगवा फडकवणारच - आपला हा दौरा राजकीय नाही असे सांगत असताना राजकारणासाठी आख्खं आयुष्य पडलंय. जानेवारीपासून ते करणारच आहे. शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी येणा-या निवडणुकीत विधानससभेवर भगवा फडकवणारच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तुमच्या हिंमतीच्या, ताकदीच्या जोरावरच मी ही जबाबदारी स्वीकारल्याचेही त्यांनी शिवसैनिकांना सांगितले.
* मराठी भाषिकांच्या ठामपणे पाठीशी - बाळासाहेब गेल्यानंतर बेळगावहून अनेकजण भेटायला आले. आपला आधार गेल्याचे त्यांनी सांगितले. परंतु त्यांना आता आम्ही आधार देणार आहोत. ज्या ज्या ठिकाणी मराठी माणूस आणि हिंदूवर अन्याय होईल तेथे शिवसेना घाव घातल्याशिवाय राहणार नाही.
* कोणतेही आंदोलन करताना विचार करा - यापुढच्या काळात शिवसैनिकांनी काम करताना, आंदोलन करताना हे आपण जे करतोय ते शिवाजी महाराजांना पसंद पडेल का, बाळासाहेबांना आवडेल का याचा विचार करूनच ते काम करावं, आंदोलन करावं असं आवाहन यावेळी उध्दव यांनी केलं.
* स्वार्थासाठी शिवसेना वापरणार नाही - शिवसेना निवडणुका लढवण्यासाठी आणि जिंकण्यासाठीच जन्माला आली नाही. ते करतच राहू. परंतु माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी शिवसेनेचा वापर कधीही करणार नाही, शिवसैनिकांशी कधीही प्रतारणा करणार नाही असे वचन देत असल्याचे यावेळी उध्दव यांनी जाहीर केले.
* जोडलेले हात आणि दाटलेले कंठ - सुमारे तीन ते चार तास शिवसैनिक व पदाधिकारी उध्दव यांची वाट पहात होते. अखेर दुपारी 3 च्या दरम्यान उध्दव आले आणि प्रचंड घोषणाबाजी सुरू झाली. व्यासपीठावर येताच त्यांनी उपस्थितांना हात जोडून वाकून नमस्कार केला आणि अनेकांचा कंठ दाटून आला. शिवसेनाप्रमुखांचं जाणं मनाला लागलेल्या उध्दव यांच्याकडे पाहून अनेकांचे हात जोडले गेले. हेच गहिवरलेपण उध्दव येथून जाईपर्यंत अनुभवायला मिळालं. ते परत जात असतानाही अनेक महिलांनी हात जोडून, दाटलेल्या कंठांनी त्यांना निरोप दिला. आक्रमक शिवसैनिक भावूक झाल्याचं चित्र यावेळी पहायला मिळालं.
उद्धव आज आणि उद्या पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेनेच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर ५ डिसेंबर रोजी नगरसह उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नगर या जिल्ह्यांत तर, ७ डिसेंबर रोजी कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांची बैठक ते घेतील.
१४ डिसेंबर रोजी पूर्व व पश्चिम विदर्भातील नागपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, वर्धा, अकोला व वाशीम या जिल्ह्यांतील आणि १६ डिसेंबर रोजी मराठवाड्यातील नांदेड, औरंगाबाद, परभणी, जालना, लातूर, बीड, उस्मानाबाद व हिंगोली या जिल्ह्यांतील शिवसेना व युवा सेनेच्या पदाधिकार्यांशी उद्धव ठाकरे संवाद साधतील. या दौ-याचा शेवट औरंगाबादमधील भव्य सभेने होईल.

* सौजन्य दिव्यमराठी