उस्‍मानाबाद -: पोलीस मुख्‍यालय उस्‍मानाबाद व स्‍टार प्राथमिक शाळा, पोलीस लाईन येथील परिसरात जिल्‍हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांच्‍या शुभहस्‍ते वृक्षारोपण करण्‍यात आले. हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम रविवार दि. 2 नोव्‍हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता संपन्‍न झाला. यावेळी निलगिरी, लिंब, अशोक या वृक्षाचे एकूण दोनशे रोपे लावण्‍यात आली. याप्रसंगी पोलीस उपअधिक्षक संभाजी पाटील, राखीव पोलीस निरीक्षक जगन्‍नाथ भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक इकबाल सय्यद यांच्‍यासह पोलीस कर्मचारी व नव‍प्रविष्‍ठ पोलीस कर्मचारी मोठ्या संख्‍येनी उपस्थित होते. उपस्थित पोलीस अधिकारी, नवप्रविष्‍ठ पोलीस कर्मचारी यांच्‍या हस्‍ते वृक्षारोपण करण्‍यात आले.
 
Top