उस्मानाबाद -: ज्या अन्न परवानाधारक व्यावसायीकांचे नोंदणी / राज्य परवान्याची मुदत 31 डिसेंबर 2012 पर्यंत असेल अशा व्यावसायीकांनी आपआपल्या परवान्याचे नुतनीकरणासाठी अर्ज दाखल करावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, अन्न व औषधे प्रशासन, उस्मानाबाद यांनी केले आहे.
अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 व नियम 2011 अन्वये असे नुतनीकरण करणे बंधनकारक आहे. मुदतीच्या आत परवान्याचे नुतनीकरण न केल्यास अन्न सुरक्षा कायदयांतर्गत् 100 रुपये प्रति दिवस दंड आकारण्यात येणार आहे. तसेच अन्न प्रतिबंधक कायदा 1954 अंतर्गत घेतलेले परवाने परावर्तीत करण्याची मुदत फेब्रुवारी 2013 पर्यंत आहे, याची सबंधितांनी नोंद घ्यावी, असेही कळविण्यात आले आहे.