बाशी (मल्लिकार्जून धारुरकर) -: खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांनी सर्वसामान्‍यांसाठी आरोग्‍य शिबीराचे आयोजन करून लोकोपयोगी उल्‍लेखनीय कार्य करीत आहे. त्‍यांच्‍या या उपक्रमास मनापासून शुभेच्‍छा, भविष्‍यात तेरणा ट्रस्‍टने सर्वोतोपरी सहकार्य करण्‍याची ग्‍वाही आमदार दिलीप सोपल यांनी दिली.
    खा.डॉ. पद्मसिंह पाटील व माजी मंत्री राणाजगजितसिंह पाटील यांच्‍या मार्गदर्शनाखाली बार्शी येथे जवाहर रूग्‍णालयात मोफत आरोग्‍य तपासणी व औषधोपचार शिबीर संपन्‍न झाले. या शिबीराच्‍या उदघाटनप्रसंगी आ. सोपल हे बोलत होते. या कार्यक्रमास खा.डॉ. पद्मसिंह पाटील, प्रशांत कोल्‍हे, जमाले, अमरसिंह, नगराध्‍यक्ष कादर तांबोळी, उपनगराध्‍यक्ष राहुल कोंढारे, नगरसेवक डॉ. भरत गायकवाड, डॉ. गोदेपुरे, डॉ. लामतुरे, राष्‍ट्रवादीचे पद‍ाधिकारी, गटनेता नागेश अक्‍कलकोटे, बप्‍पा कसबे, मुन्‍ना शेटे, सौ. खोगरे, सौ. परांजपे, बाबुराव जाधव, सोडळ, मेनकुदळे आदीजण उपस्थित होते.
    गरीब व गरजू रूग्‍णांना मोफत औषधोपचार मिळावे, तसेच त्‍यांना आवश्‍यकतेनुसार शस्‍त्रक्रियेपर्यंत सर्वतोपरी मदत मिळवून देऊन सर्वसामान्‍य नागरिकांना दिलासा दिला आहे. सोलापूर व उस्‍मानाबाद जिल्‍ह्यातील भूम, परंडा, वाशी, कळंब, तुळजापूर, उमरगा, लोहारा इत्‍यादी ठिकाणी आजपर्यंत 8 हजार 518 रूग्‍णांची तपासणी केली आहे. बार्शी येथे 800 रूग्‍णांची तपासणी करण्‍यात आली आहे. रूग्‍णांच्‍या तपासणीसाठी तेरणा वैद्यकीय महाविद्यालय व रूग्‍णालयातील डॉ.पी.डी. आनंद, डॉ. पी.ए. पाखरे, डॉ. शैलेश माने, डॉ. संजय गडदे, यांच्‍यासह अनेक तज्ञ व वैद्यकीय अधिका-यांनी तपासणी केली.  

 
Top