नागपूर -: हुतात्मा बाबू गेनू सैद यांच्या शहीद दिनानिमित्त आज हैद्राबाद हाऊस येथील मुख्यमंत्री सचिवालयात त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
     मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील, मुख्य सचिव जयंत कुमार बांठिया यांनी बाबू गेनू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. या प्रसंगी सामान्य प्रशासन विभागाचे सचिव (प्रशासकीय सुधारणा) भास्कर मुंडे, नागपूरचे विभागीय आयुक्त्‍ा बी. वेणूगोपाल रेड्डी आदी उपस्थित होते.
     1908 मध्ये जन्मलेल्या बाबू गेनू यांनी आपल्या तरुणपणी महात्मा गांधी यांनी केलेल्या आवाहनानुसार परदेशी कपड्यांची आयात करण्याच्या विरोधातील  आंदोलनात सहभाग घेऊन, 12 डिसेंबर, 1930 रोजी परदेशी कपडे मुंबईत आणणाऱ्या ट्रक समोर उडी मारुन त्यांनी जीवाची आहुती दिली होती.
 
Top