उस्मानाबाद -: हुतात्मा बाबु गेनू यांच्या शहीद दिनानिमित्त आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना आदरांजली वाहण्यात आली. अप्पर जिल्हाधिकारी ज्ञानोबा फुलारी यांनी हुतात्मा बाबू गेनू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपजिल्हाधिकारी बी.एस. चाकूरकर, के.ए.तडवी, मिनाज मुल्ला, शिल्पा करमरकर व राम मिराशे, तहसीलदार श्रीमती मेने, श्रीमती मोरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.