उस्मानाबाद : अपंग विद्यार्थ्यांनी अपंगत्वावर मात करून प्रबळ इच्छा शक्तीच्या जोरावर या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी गगन भरारी घेतली, असे गौरवउदगार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ.सुभाष व्हट्टे यांनी काढले.
समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांच्या वतीने दि.22 व 23 डिसेंबर रोजी अपंग मुला-मुलींच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन श्री तुळजाभवानी स्टेडियम येथे करण्यात आले होते. या क्रीडा स्पर्धांचे परितोषिक वितरण समारोप जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ.सुभाष व्हट्टे यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी समाजकल्याण सभापती दगडू धावारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब वानखेडे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी खुशाल गायकवाड यांची उपस्थिती होती.
यावेळी श्री.व्हट्टे म्हणाले की, अपंगत्वाच्या न्युनगंडाची भावना मनामध्ये न ठेवता अपंगत्वावर मात करुन त्यांनी क्रीडा स्पर्धेत दाखविलेला उत्साह व सहभाग कौतूकास्पद आहे. या अपंग खेळांडू विद्यार्थ्यांनी स्वत: मधील कला, क्रीडा व संस्कृतीला वाव देऊन जिद्दीने परिश्रम घ्यावेत व आपला सर्वांगीण विकास करावा, असेही त्यांनी सांगितले.
या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमात अस्तिव्यंग, मुकबधिर, मनोविकलांग व अंध या प्रवर्गाच्या एकूण 23 शाळा मधील 444 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये धावणे, गोळाफेक, थाळीफेक, व्हील चेअर रेस, सॉफटबॉल थ्रो, लांब उडी, बुध्दीबळ आदि खेळाबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमही घेण्यात आले होते. या स्पर्धेमधून प्रथम क्रमांकाने विजेत्या स्पर्धकाचे राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवडही केली जाणार आहे.
क्रीडा स्पर्धा :- मुकबधीर प्रवर्गात संत ज्ञानेश्वर महाराज मुकबधिर विद्यालय,कळंब यांनी प्रथम, निवासी मुकबधीर विद्यालय, वाशी यांना द्वितीय तर सोजर मुकबधिर विद्यालय, भूम यांना तृतीय पारितोषिक मिळाले. आस्थिव्यंग (शाळा प्रवर्ग) वयोगट 6 ते 18 यामध्ये-निवासी अपंग शाळा, सास्तूर यांना प्रथम, डॉ.बाबासाहेब आंबेडकर अस्थिव्यंग निवासी विद्यालय, होर्टी यांना द्वितीय तर नुतन अपंग निवासी विद्यालय नळदूर्ग यांना तृतीय परितोषिक देण्यात आले. आस्थिव्यंग (कार्य शाळा प्रवर्ग) वयोगट 18 ते 25 यामध्ये शांतेश्वर अस्थिव्यंग प्रशिक्षण, सास्तूर यांना प्रथम तर नवजीवन अपंग केंद्र, खानापूर यांना द्वितीय परितोषिक देण्यात आले. मतीमंद प्रवर्गात सोजर मतीमंद निवासी विद्यालय,कळंब यांना प्रथम, श्री स्वामी समर्थ मतीमंद निवासी शाळा,कळंब यांना द्वितीय तर निवासी मतिमंद विद्यालय वाशी यांना तृतीय परितोषिक देण्यात आले. अंध प्रवर्गात संत कबीर अंध निवासी विद्यालय,उस्मानाबाद यांनी प्रथम पारितोषिक पटकावले.
सांस्कृतिक स्पर्धा :- मुकबधीर प्रवर्गात निवासी मुकबधीर विद्यालय, उमरगा यांनी प्रथम, स्वामी समर्थ मुकबधीर विद्यालय, उस्मानाबाद यांना द्वितीय तर संत ज्ञानेश्वर महाराज विद्यालय, कळंब यांना तृतीय बक्षीस मिळाले. आस्थिव्यंग ( शाळा प्रवर्ग) वयोगट 6 ते 18 यामध्ये निवासी अपंग शाळा,सास्तूर यांना प्रथम, नुतन अपंग निवासी विद्यालय नळदूर्ग यांना द्वितीय तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर अस्थि.निवासी विद्यालय होर्टी व कै. उदध्वराव पाटील अपंग विद्यालय,उस्मानाबाद यांना संयुक्त तृतीय परितोषिक देण्यात आले. आस्थिव्यंग ( कार्य शाळा प्रवर्ग) वयोगट 18 ते 25 यामध्ये नवजीवन आस्थिव्यंग प्रशिक्षण, खानापूर (नाटक) यांना प्रथम तर शांतेश्वर अस्थिव्यंग प्रशिक्षण, सास्तूर यांना द्वितीय परितोषिक देण्यात आले. मतीमंद प्रवर्गात नागनाथ मतीमंद शाळा, खानापूर (मुकनाटक) यांना प्रथम, सोजर मतीमंद शाळा,कळंब यांना द्वितीय तर श्री स्वामी समर्थ मतीमंद शाळा,उस्मानाबाद (डान्स) यांना तृतीय परितोषिक देण्यात आले. अंध प्रवर्गात संत कबीर संघ विद्यालय, उस्मानाबाद (गायक) यांनी प्रथम पारितोषिक पटकावले.
या क्रीडा स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी युवराज भोसले, सुभाष शिंदे, श्रीमती टी.वाय.मुल्ला, प्रकाश पवार, बी.डी.सिरसट, वाय.एस.चाकुरे, पांडूरंग कांबळे, पी.जी.कुंभार, नाना सिरसट यांच्यासह जि.प.समाजकल्याण विभागातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या क्रीडा स्पर्धेत मोठया प्रमाणात अपंग क्रीडा प्रेमी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी नादरगे यांनी तर आभार अंकुश माने यांनी मानले.