उस्मानाबाद : लातूर विभागीय मंडळातंर्गत सर्व मान्यता शाळेच्या मुख्याध्यापकांना आवाहन करण्यात येते की, माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा मार्च-2013 साठी नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे सादर केलेल्या विद्यार्थ्यांची प्रिलिस्ट  दि.26 डिसेंबर 2012 रोजी नेहमीच्या जिल्ह्च्या वितरण केंद्रावर सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत वाटप करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व मान्यता प्राप्त माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकांनी आपला प्रतिनिधी जिल्ह्याच्या वितरण केंद्रावर प्रिलिस्ट स्विकारण्यासाठी पाठवावा,असे आवाहन विभागीय सचिव, लातूर विभागीय मंडळ, लातूर यांनी केले आहे.                    

 राष्ट्रीय मतदार दिनाचे आयोजन  
उस्मानाबाद -: जिल्ह्यात राष्ट्रीय मतदार दिन म्हणून दि.25जानेवारी 2013 रोजी साजरा करण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी, उस्मानाबाद यांनी केले आहे.
 
Top