मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती अधिकारी, उपसंचालक, महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली व पणजी (गोवा) यांच्यामार्फत डिसेंबर, 2012 ते फेब्रुवारी, 2013 या कालावधीत महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण-2010 अंतर्गत ग्रंथोत्सव-2012 हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमा करीता 35.00 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
ग्रामीण व शहरी भागातील लोकांमध्ये, वाचन संस्कृतीमध्ये वाढ व्हावी, तसेच ग्रंथप्रेमींना एकाच ठिकाणी विविध ग्रंथ, साहित्य व वाड्.मय विषयक पुस्तके उपलब्ध व्हावी, या उद्देशाने राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये या ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.