नवी दिल्ली -: गेल्या 13 दिवसापासून मृत्यूशी झुंज देणा-या 23 वर्षीय बलात्कार पीडितेचा शनिवारी सिंगापूरात मृत्यू झाल्यानंतर दिल्लीतील तरुणाईने या घटनेच्या निषेधार्थ शांतीमोर्चा काढला आहे. देशाची राजधानी दिल्लीत वैद्यकीय शिक्षण घेणा-या एका उच्चशिक्षित मुलींवर सहा नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्यानंतर संपूर्ण देश संतप्त आहे. तसेच या घटनेने देशाच्या इज्जतीची लक्तरेच निघालीच आहे. गेल्या १३ दिवसापासून दिल्लीतील तरुणाईने आंदोलन करुन राग व्यक्त केला. पण आज तरुणाईने कोणताही शब्दही न उच्चारता केवळ संपूर्ण दिल्लीतून शांतीमोर्चा काढला आहे. दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठापासून ते मुनारिकापर्यंत (जेथे ही पीडित मुलगी 'त्या' बसमध्ये बसली होती) हा शांतीमोर्चा काढण्यात येणार आहे. दरम्यान, जंतरमंतर सामील झालेल्या दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना तरुणाईने घेराव घातला. त्यानंतर दीक्षित यांनी तेथून काढता पाय काढला.
       या तरुणाच्या मृत्यूनंतर संपूर्ण देश गहिवरला. राष्ट्रपती, पंतप्रधान, महिला आयोग, दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दिक्षीत यांच्यापासून देशातील उद्योगपती, सेलेब्रेटी ते सोशल नेटवर्क साईटवरील सामान्य नागरिकांनी या घटनेचा रोष व्यक्त केला आहे. आपण देशाची लाडो (मुलगी) गमावली असल्याच्या प्रतिक्रिया देशभर सर्वजण उमटत आहेत.
        दरम्यान, दिल्ली पोलिसांनी त्या सहा नराधाम आरोपींवर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलीचा मृत्यू झाल्यानंतर आज सकाळी दिल्ली पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.

* सौजन्‍य दिव्‍यमराठी
 
Top