नळदुर्ग -: राष्ट्रीय महामार्गावरील शिरगापूर (ता. तुळजापूर) पाटीजवळ पाऊण लाख रूपये किंमतीचा गांजासह दोघा आरोपींना पोलीसानी रंगेहाथ पकडल्यानंतर या घटनेतील आणखी दोघा आरोपींना मुंबई येथून पोलीसानी अटक करून पुढील तपासासाठी आंध्रप्रदेशातील जहिराबादकडे गेल्याचे पोलीसानी सांगितले.
कविता ऊर्फ लक्ष्मी सुपरमणी नायर (वय ४५, रा. सायन मुंबई), जगदिश वर्मा (वय ३0, रा.चेंबूर, मुंबई) असे मुंबई येथून अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत. तर यापूर्वी राकेश राजू पुजारी (वय २0, रा. साईन कोळीवाडा, चेंबूर मुंबई) व गौतम पंडित भुतूडे (वय २0, रा. टाटा कॉलनी मुंबई) या युवकाना अटक करण्यात आली होती.
सोलापूर-हैदराबाद महामार्गावरील शिरगापूर पाटीजवळ दि. 3 डिसेंबरच्या मध्यरात्री गस्त घालणा-या पोलीसानी 37 किलो गांजा किंमत 74 हजार रूपये या मुद्देमाल दोन युवकाना अटक केली होती. हा गांजा जहिराबादहून मुंबईकडे कापडी बॅगमध्ये भरुन घेऊन जाणारे राकेश पुजारी व गौतम भुतूडे हे सोमवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास शिरगापूर पाटीवर उतरले होते. यावेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांना या दोघांवर संशय आल्याने त्यांची चौकशी केली.यावेळी राकेश आणि गौतम यांनी गांजा घेऊन मुंबईला जात असल्याचे सांगितले. त्यावरून या दोघांना अटक करून नळदुर्ग पोलीसात गुन्हा दाखल केला होता.
या प्रकरणी अधिक तपासासाठी नळदुर्ग पोलिसांचे पथक मुंबई येथे गेले होते. तेथे तपास करून पोलिसांनी कविता ऊर्फ लक्ष्मी नायर, जगदिश वर्मा या दोघांना मुंबई येथे राहत्या घरातून अटक करून नळदुर्गयेथे आणले. या पथकात पोलिस उपनिरीक्षक मुबारक शेख, पोकॉ संजय शिंदे, राजेश चव्हाण, गोपाळ घारगे यांचा समावश होता. या सर्वांना १५ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, पोलिस इतर आरोपींचा शोध पोलिस घेत असून, यासाठी हे पथक अटक केलेल्या आरोपींसह जहिराबादकडे रवाना झाल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.