सोलापूर : पंढरपूर तीर्थक्षेत्राचा केंद्रीय पर्यटन स्थळाच्या यादीत समावेश करावा. पंढरपूर येथे वर्षभरात लाखो भाविक येत असतात. येथे पायाभूत सुविधा व अनुषंगिक विकासासाठी नांदेडच्या गुरुत्ता गद्दीच्या धर्तीवर विशेष बाब म्हणून तरतूद संबधित मंत्रालयाकडून होण्याबाबतचे निवेदन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी महामहिम राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना पंढरपूर दौ-यात दिले.
    लोणंद - बारामती आणि लोणंद - पंढरपूर रेल्वे मार्गाचे सर्वे व भूसंपादनाची कार्यवाही झालेली आहे. सदरचे काम सुरु करुन लवकरच पूर्ण होण्यासाठी निधी उपलब्ध व्हावा. भिमा (उजनी) हा राज्यातील महत्वपूर्ण प्रकल्प आहे. याचे काम अनेक वर्षापासून सुरु आहे. या प्रकल्पाचे काम पूर्ण होण्यासाठी 350 कोटी रुपयाची आवश्यकता आहे. यासाठीचा निधी संबधित केंद्र शासनाच्या मंत्रालयाकडून उपलब्ध होऊन हे काम लवकर पूर्ण व्हावे आदि कामाचा अल्लेख पालकमंत्र्यांनी दिलेल्या निवेदनात केला आहे.
 
Top