सोलापूर : सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, सोलापूर यांचे वतीने अनुसूचित जातीच्या गटई काम करणा-या लाभार्थ्यांना लोखंडी स्टॉल व 500/- रुपये रोख देवून त्यांना व्यवसायासाठी मदत केली जाते.सन 2010-11 व 2011-12 मध्ये प्राप्त झालेल्या व परिपूर्ण असलेल्या सर्व गटई काम करणा-या लाभार्थ्यांची मंजूरी शासनाने दिलेली असून त्यांना मार्च 2013 पर्यंत गटई स्टॉल मिळणार आहेत. काही लोक मंजूरी मिळालेल्या लाभार्थ्यांची दिशाभूल करुन त्यांच्याकडून परस्पर अतिरिक्त कागदपत्रांची मागणी करतात व आर्थीक लूबाडणूक करीत असल्याचे कळविले आहे. त्यानुसार कोणत्याही लाभार्थ्याने सदर पिळवणूकीस बळी न पडता अधिक  माहिती हवी असल्यास सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सातरस्ता, सोलापूर येथे संपर्क साधावा.       

कन्यादान योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
सोलापूर : सामाजिक न्याय विभागाच्या वतीने अनुसूचित जाती, विजाभज, ‍विशेष मागासवर्गीय    आर्थीक कमकुवत असलेल्या कुटूंबातील सामुहिक विवाह सोहळयामध्ये सहभागी होवून विवाह करणा-या जोडप्यांसाठी कन्यादान योजना सुरु करण्यात आलेली आहे.
    या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती, विजाभज, विशेष मागास प्रवर्गातील सामुहिक विवाह सोहळयामध्ये सहभागी होणा-या जोडप्यास वस्तूरुपात देण्यात येणा-या अनुदानाची रक्कम रुपये 10,000/- इतकी रक्कम वधुचे वडील, आई किंवा  पालकांच्या नावे अधोरेखीत धनादेशाव्दारे (क्रॉस चेकने) लग्नाच्या दिवशी देण्यात येते.
    सामुहिक विवाह सोहळा आयोजित करणा-या स्वयंसेवी संस्थाना प्रति पात्र जोडपे रुपये 2000/- प्रोत्साहनात्मक अनुदान देण्यात येते. यासाठी तीन महिन्यांच्या आत विवाह नोंदणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. या प्रकरणी अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन, सातरस्ता, सोलापूर यांच्याशी संपर्क साधावा.
 
Top