सौ. कल्‍पना गायकवाड
नळदुर्ग -: नगरपालिकास्तरीय दक्षता समितीच्या सदस्यपदी नळदुर्ग येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. कल्पना सखाराम गायकवाड निवड करण्यात आली आहे. ही निवड जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये करण्यात आले असून त्यांना नियुक्तीचे पत्र तुळजापूर तहसिलदार यांनी देऊन कळविले आहे. त्याबद्दल कल्पना गायकवाड यांचे अभिनंदन केले जात आहे. नगराध्यक्ष नितीन कासार, प्रभारी नगराध्यक्ष शहबाज काझी, कॉंग्रेसचे गटनेते तथा नगरसेवक शब्बीर सावकार, माजी नगराध्यक्ष दत्तात्रय दासकर, पाणीपुरवठा सभापती मुन्वर सुलताना, तालुका दक्षिता समितीच्या सदस्या शाहेदाबी सय्यद, समाज विकास संस्थेच्या अध्यक्षा संगीता गायकवाड, जिजाबाई जाधव, महिला कॉंग्रेसच्या तालुकाध्यक्षा सुभद्रा मुळे, शशिकांत घोडके आदीनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.

 
Top