नळदुर्ग -: आंध्रप्रदेशातून गुजरात राज्यामध्ये बेकायदेशीर गुटख्याची चोरटी वाहतूक करीत असताना पोलीसानी मोठ्या शिताफीने सुमारे साडे सहा लाख रूपये किंमतीचा गोवा नावाचा गुटखा जप्त केला आहे. यावेळी गुटखा वाहतूक करणा-या एका व्यक्तीसह टाटा टेम्पो पोलीसानी ताब्यात घेतले. ही घटना सोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील जळकोट (ता. तुळजापूर) शिवारात बोरमन तांड्याजवळ शनिवार रोजी सायंकाळी साडे सहा वाजता घडली.
अखिल करीम शेख (वय 28 वर्षे, धंदा चालक, रा. टोली चौक, हमीद पेठ, मिराज कॉलनी, हैदाबाद) असे पोलीसानी ताब्यात घेतलेल्या टेम्पोचालकाचे नाव आहे. टाटा टेम्पोमध्ये (क्र. केए. 56 / 368) हैदराबाद येथून हिरवा व लाल रंगाचा गोवा गुटख्याचा माल भरुन गुजरात राज्यातील सिलव्हासा शहराकडे घेऊन जात असताना जळकोट (ता. तुळजापूर) शिवारात बोरमन तांड्याजवळ राष्ट्रीय महामार्गावर पोलीसाच्या पथकाने मोठ्या शिताफीने पकडले. दरम्यान टेम्पोमधून गोवा गुटख्याचे बेकायदेशीर वाहतूक होत असल्याचे पोलीसानी पूर्व सूचना मिळाली होती. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी शर्मिष्ठा घारगे वालवलकर, नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शेटकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार बब्रुवान घोडके, सुहास गवळी, राजेश कोळी, सलीम शेख, राजा साळुंखे, खलील शेख, खारगे बी.एन. यांच्यासह इतर पोलीस कर्मचा-यांनी जळकोट येथे आठवडी बाजार असल्याने गावापासून एक किमी अंतरावर बोरमन तांड्याजवळ सापळा रचून बेकायदेशीर 6 लाख 54 हजार रूपये किंमतीचा गोवा गुटख्याच्या मुद्देमाल व टाटा टेम्पो पोलीसानी जप्त करून टेम्पोचालकास ताब्यात घेतले. त्यानंतर ही घटना उस्मानाबादच्या अन्न भेसळ कार्यालयास कळविण्यात आले. त्यावरुन अन्न सुरक्षा अधिकारी व्ही.एस. लोंढे, नमुना सहाय्यक टी.यू. आकोसकर, आर.एल. कांबळे यांनी नळदुर्ग पोलीस ठाण्यास रविवार रोजी सकाळी अकरा वाजता भेट देऊन पंचनामा केला. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शेटकर, भिमराव राठोड, ठाणे अंमलदार कल्याण पवार, सुनील मनगिरे, अशोक गिरी, सुधाकर माडगे यांच्या उपस्थितीत गोवा गुटख्याचा पंचनामा केला असता हिरवे व लाल गोवा 1000 गुटखा असलेल्या वीस पोत्यामध्ये प्रत्येकी एका पोत्यात सहा लहान पोते असे मिळून 120 पोते किंमत 6 लाख 54 हजार रूपयेचा मुद्देमाल आढळून आला. याबाबत अन्नसुरक्षा अधिकारी लोंढे यांनी बोलताना सांगितले की, अन्नसुरक्षा व मानदी कायद्यान्वये 2006 अंतर्गत दि. 19 जुलै 2012 च्या अधिसुचनेनुसार महाराष्ट्रात गुटखा बंदी करुन गुटखा व पान मसाला वितरण, उत्पादन, विक्री, साठवणूक करण्यास बंदी घातली असून याप्रकरणी मुंबई आयुक्त यांच्या आदेशानुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे. तसेच मुद्देमाल टेम्पोसह उस्मानाबाद येथे नेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.