उस्मानाबाद -: प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी होणारा लोकशाही दिनाचा उपक्रम येथील जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात येतो. मात्र जानेवारी ते मार्च, 2013 या कालावधीत मुदती संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक पोटनिवडणूकांसाठी निवडणूक कार्यक्रम घेाषित केल्याने व त्याबाबत आचारसंहिता लागू असल्याने डिसेंबर, 2012 मधील लोकशाही दिन उपक्रम घेण्यात येणार नाही, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. के.एम.नागरगोजे यांनी केले आहे.