उस्मानाबाद -: दारिद्रयरेषेखालील भुमिहीन अनुसुचित जाती व नवबौध्द शेतमजुर कुटूंबांचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढावे व त्यांचे राहणीमानात सुधारणा व्हावी, त्याचे शेतमजुरीवर असलेले अवलंबित्व कमी व्हावे, या उदे्शाने शासनामार्फत कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबळीकरण योजना राबविण्यात येत आहे. ही योजना सन 2004 पासुन सुरु केली आहे. या योजनेमध्ये शासनाने अंशत: बदल केला असल्याचे सहायक आयुक्त, समाज कल्याण,उस्मानाबाद यांनी कळविले आहे.
या योजनेअंतर्गत पूर्वी लाभार्थ्यास 4 एकर कोरडवाहू किंवा 2 एकर बागायती जमीन 50टक्के अनुदान व 59 टक्के बिनव्याजी कर्ज अशा स्वरुपात वितरीत करण्यात येत होती. आता जर लाभार्थ्यांने स्वत:4 एकर कोरडवाहु किंवा 2 एकर बागायती जमीनीचा शोध घेतल्यास व योजनेच्या इतर अटी व शर्ती तो लाभार्थी पुर्ण करत असल्यास संबधित लाभार्थ्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच जमिन खरेदी ही रेडी रेकनरच्या किंमती प्रमाणे करण्यात येते. तीन लाख रुपये या कमाल मर्यादेपर्यंत जमीन खरेदी करण्यात येऊ शकते. तेव्हा या योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांनी घ्यावा. अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण,उस्मानाबाद यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.