उस्मानाबाद :- जिल्ह्यातील माजी सैनिक तसेच विधवा, युध्द विधवा व अवलंबित कुटुंबियांच्या अडचणी सोडविण्यासाठी येथील जिल्हा सैनिक कार्यालयातील कल्याण संघटक 6 डिसेंबर रोजी परंडा, 7 रोजी तुळजापूर , 13 रोजी कळंब, 20 रोजी वाशी, 21 रोजी उमरगा, 27 रोजी भूम आणि 28 डिसेंबर रोजी लोहारा तालुक्याच्या ठिकाणी सकाळी 10 ते सायंकाळी 5-45 या वेळेत संबंधित तहसील कार्यालयात उपस्थित राहणार आहेत. तरी अवलंबितांनी या संधीचा लाभ घ्यावा व आपली सर्व कामे तालुक्याच्या ठिकाणीच करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, उस्मानाबाद यांनी केले आहे.