भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबडेकर यांचा दि. 6 डिसेंबर रोजी ' महापरिनिर्वाण दिन ' डॉ.आंबडेकर घटनेचे शिल्पकार, दीनदलितांचे कैवारी तर होतेच .त्याचबरोबर ते संपादकही होते. त्यांनी प्रबुध्द भारत, जनता ,मूकनायक ही वृत्तपत्रे चालविली. आपली लेखणी दीनदुबळयांच्या प्रबोधनासाठी झिजवली. अशा थोर संपादकाच्या पत्रकारितेवर टाकलेला दृष्टीक्षेप !
सामाजिक सुधारणेसाठी वृत्तपत्रांनी महत्वपूर्ण भूमिका बजावल्याचे दिसून येते. स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांविरुध्द जनतेत असंतोष निर्माण व्हावा,जागृती व्हावी म्हणून वृत्तपत्रांनी आपली परखड भूमिका मांडली.अशी वृत्तपत्रे ही देश स्वातंत्र्याच्या बाजूची होती. तर त्याच काळातील काही वृत्तपत्रांची भूमिका ही सामाजिक स्वातंत्र्याची होती. समाजातील अस्पृश्यता, जातीभेद नष्ट व्हावा यासाठी प्रयत्नशील होती.या वृत्तपत्रांनी शिक्षणाचे महत्व पटवून देऊन समाजात अंधश्रध्दा दूर करण्यासाठी , मानवी हक्कासाठी जनतेत जागृती केल्याचे दिसून येते. त्याचा परिणामही बहुजनात दिसून आल्याने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबडेकरांनी वृत्तपत्र सुरु करण्याचा निर्णय घेतला.
डॉ.बाबासाहेब आंबडेकर यांच्याकडे केवळ घटनेचे शिल्पकार व दलितांचे नेते म्हणून पाहिले जाते.मात्र ते एक संपादक,पत्रकार होते. याकडे वृत्तपत्रांच्या इतिहास लेखकांनी दुर्लक्ष केले आहे.ब्राम्हणेतरांच्या वृत्तपत्रांनी जे सामाजिक सुधारणेसाठी योगदान दिले. त्यांची प्ररेणा घेऊन डॉ.आंबडेकरांनी वृत्तपत्र काढण्याची कल्पना मांडली. वृत्तपत्र हे आधुनिक युगाचे, प्रगतीचे , लोकशिक्षणाचे चांगले माध्यम असल्याने त्याद्वारे अस्पृश्यांच्या हक्कांची मागणी मांडता येईल असे लक्षात आल्यावर त्यांनी 31 जानेवारी 1920 रोजी ' मूकनायक ' हे पाक्षिक सुरु केले.

* मूकनायकाची भूमिका !
मूकनायकात डॉ.आंबेडकरांनी एकूण 14 लेख लिहिले. त्यानंतर ते पुढील उच्चशिक्षणासाठी लंडनला गेले. आपल्या पहिल्याअंकात वृत्तपत्र सुरु करण्यामागील भूमिका त्यांनी मांडली आहे. ते म्हणतात, “ आमच्या या बहिष्कृत लोकांवर होत असलेल्या व पुढे होणाऱ्या अन्यायावर उपाय-योजना सुचविण्यास तसेच त्यांची भावी उन्नती व तिचे मार्ग यांच्या खऱ्या स्वरुपाची चर्चा होण्यास वर्तमानपत्रासारखी अन्य भूमिच नाही. परंतू मुंबई इलाख्यात निघत असलेल्या वृत्तपत्रांकडे पाहिले असता असे दिसून येईल की, त्यातील बरीचशी पत्रे विशिष्ट अशा जातीचे हितसंबध पाहणारी आहेत. इतर जातींच्या हिताची पर्वा त्यांना नव्हती. इतकेच नव्हे तर केव्हा केव्हा त्यांना अहितकारक असेही त्यातून प्रलाप निघतात. अशा वृत्तपत्रांना आमचा एवढाच इशारा आहे की,कोणतीही एखादी जात अवनत झाली तर तिच्या अवनतीचा फटका इतर जातीस बसल्याशिवाय राहणार नाही. समाज ही नौकाच आहे.ज्याप्रमाणे आगबोटीत बसून प्रवास करणाऱ्या उतारुने जाणून-बुजून इतरांचे नुकसान करावे म्हणून म्हणा किंवा आपल्या विनाशक स्वभावामुळे म्हणा, जर का इतरांच्या खोलीस छिद्र पाडले तर सर्व प्रवाशांबरोबर त्यालाही आधी किंवा नंतर जलसमाधी ही घ्यावीत लागते. त्याचप्रमाणे एका जातीचे नुकसान केल्याने अप्रत्यक्ष नुकसान करणा-या जातीचेही नुकसान होणार, यात बिलकुल शंका नाही. म्हणूनच स्वहीत साधू पत्रांनी इतरांचे नुकसान करुन आपले हित करावयाचे पढतमुर्खाचे लक्षण शिकू नये. सर्व जातीच्या हिताची भूमिका वृत्तपत्रांनी घेतली तरच ते सर्वांच्या हिताचे ठरते. आत्मकेंद्रित आणि स्वार्थाने प्रेरित वृत्तपत्रे ही समाजासाठी नुकसानकारकच ठरणारी असतात.” असा इशारा डॉ.आंबेडकरांनी आपल्या पाहिल्याच अंकात दिला आहे.
' मूकनायक ' जवळपास सहा माहिने व्यवस्थित चालले. पुढे अंतर्गत वादामुळे ते 1923 साली बंद पडले. अल्पकाळातही ' मूकनायक ' ने दलितांमध्ये एक चळवळ उभी केली. आपल्याला न्याय हक्कांची जाणीव करुन दिली. सामाजिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रातही आपल्या अस्तित्वाची निकड असल्याची जाणीव करुन देण्याबरोबरचे ' मूकनायक ' ने अस्पृश्यांची अस्मिता जागविण्याचेही कार्य केले.

* बहिष्कृत भारतचा शुभारंभ
समाजातील काही घटकांनी जातपात, अस्पृश्यतेला खतपाणी घातल्याने अशा सनातनी आव्हानाला तोडीस तोड उत्तर देण्यासाठी चळवळ आधिक सक्षम करणे आंबडेकरांना गरजेचे वाटले व त्यांनी 1934 मध्ये ' बहिष्कृत हितकारणी सभा ' स्थापना केली. त्या सभेद्वारे त्यांनी आपले आंदोलन सुरु ठेवले. याच काळात त्यांनी बहिष्कृत परिषद घेतली.चवदार तळयाचे पाणी पिण्याचा सत्याग्रहही केला. अस्पृश्यांची चळवळ भक्कम करण्यासाठी आपले वृत्तपत्र असल्याशिवाय पर्याय नाही असे त्यांना पुन्हा वाटू लागले व 3 एप्रिल 1927 रोजी त्यांनी ' बहिष्कृत भारत ' वृत्तपत्र सुरु केले. बहिष्कृत भारतात आंबेडकरांनी जवळपास 33 अग्रलेख लिहिले व अन्य प्रकारचे लेखनही केले. या वृत्तपत्राची संपादनासह सर्व जबाबदारी त्यांनी एकटयाने सांभाळली. महार वतन, महाडचा धर्मसागर, अस्पृश्यता निवारण, धर्मांतर, जातीभेद, शिक्षण, स्वांतत्र्य आदि विषयावर लेख - अग्रलेख लिहून सखोल चर्चा केल्याचे आढळून येते. महारांमध्ये निष्क्रियता निर्माण होण्यास करणीभूत ठरणारी वतनदारी पध्दती बंद व्हावी म्हणून आंबेडकरांनी प्रयत्न केले. याबाबत अनेक लेख लिहून हा मुद्दा सर्व पातळीवर नेण्याचा प्रयत्न केला . वतनदारी नष्ट झाली तरच शोषण थांबेल असा त्यांचा ठाम विश्वास होता.
अस्पृश्यता नष्ट झाल्याशिवाय समाजमने एकत्र नांदू शकणार नाहीत,यासाठी सामुहिक भोजन व आंतरजातीय विवाह या मार्गाचा अवलंब करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. 13 ऑक्टोबर 1935 रोजी आंबेडकरांनी ' येवला ' येथे धर्मांतराची घोषणा केली. सनातनी वृत्तपत्रांनी त्यांच्यावर कडक टीका केली. ज्या धर्मात राहून हक्क मिळत नाही, तो धर्मच त्यागणे अधिक चांगले, असे आंबेडकरांनी जाहीर केले. या संदर्भात आपली भूमिका बहिष्कृत भारतात अग्रलेखातून स्पष्ट केली.
या काळातच आंबेडकरांनी हिंदुसभा लुळी का पडली, हिंदू महासभा विरुध्द हिंदू मंडळ, खुदा देखता है, शारीरिक उन्नतीला धर्माची हरकत, अस्पृश्योन्नतीचा आर्थिक पाया, आजकालचे प्रश्न आदी लेख लिहून समाज जागृती केली. ' बहिष्कृत भारत ' तीन वर्ष व्यवस्थित निघाल्यानंतर आर्थिक अडचण भासू लागली. शेवटी 15 नोव्हेंबर 1929 रोजी ते बंद करावे लागले.

* दलितांचे शस्त्र : जनता
डॉ. आंबेडकरांना वृत्तपत्राची शक्ती माहित होती. वृत्तपत्र हाताशी नसल्याने त्यांना अस्वस्थ वाटू लागले. चळवळ दूरवर पोहचण्यासाठी वृत्तपत्र हवे, असे त्यांना वाटू लागले व पुन्हा मोठया जिद्दीने 24 नोव्हेंबर 1930 रोजी ' जनता ' नावाचे वृत्तपत्र सुरु केले. प्रारंभी ते पाक्षिक रुपात निघायचे, नंतर त्याचे रुपांतर साप्ताहिकात झाले. त्यांना परदेशात जायचे असल्याने ' जनता ' ची जबाबदारी देवराव नाईक यांच्यावर सोपवली. परदेशात असले तरी त्यांनी ' जनता ' साठी लेख पाठविले. वेळोवेळी मदत केली. ' जनता ' कसे असावे, काय छापावे, याचे वेळोवेळी मार्गदर्शन डॉ.आंबेडकर करत होते म्हणूनच हे साप्ताहिक 1955 पर्यंत म्हणजे जवळपास 25वर्षें चालले.
' जनता ' च्या या प्रदीर्घ प्रवासात दलित जनतेची मोठी साथ लाभली होती. डॉ. आंबेडकरांचा लेख ' जनता ' त आहे म्हटल्यावर वाचकांच्या उडया पडायच्या एवढी लोकप्रियता लाभली होती. ' जनता ' म्हणजे दलितांचे शस्त्रच होते. एका मार्गदर्शकाची भूमिका ' जनता ' ने सांभाळली होती. दलितांना बंडखोरीचे तत्वज्ञान आणि संघर्ष वृत्ती ' जनता ' नेच प्रदान केली, म्हणूनच ' जनता ' वृत्तपत्राचे स्थान मोठे आहे.
1956 मध्ये डॉ.आंबेडकर भारतात आल्यावर ' जनता ' पत्राचे त्यांनी नामांतर करुन त्याचे रुपांतर ' प्रबुध्द भारत ' असे केले. पुढे ते ' प्रबुध्द भारत ' चे काम फार काळ पाहू शकले नाहीत. त्यांच्या मृत्यूनंतर संपादकीय मंडळ नियुक्त झाल्यानंतर पुन्हा प्रबुध्द भारतची दमदार वाटचाल सुरु झाली. यशवंतराव आंबेडकर, मुकुंदराव आंबेडकर, दादासाहेब रुपवते , शंकरराव खरात यांनी प्रबुध्द भारताची जबाबदारी स्वीकारली. या प्रत्येक मान्यवरांनी वृत्तपत्राला एक नवी दिशा दिली. 3 ऑक्टोबर 1957 रोजी अ.भा.रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाल्यानंतर हे वृत्तपत्र पक्षाचे मुखपत्र झाले. दोन-तीन वर्षे मुखपत्र म्हणून यशस्वी कामगिरी बजावल्यानंतर संपादकीय मंडळात अंतर्गत वाद सुरु झाले व त्याचे पर्यवसान 1961 ला हे वृत्तपत्र बंद पाडण्यात झाले.
स्वातंत्र्यपूर्व काळात व नंतरही अनेक वृत्तपत्रे निघाली व बंद पडली. मात्र समाज प्रबोधनासाठी अशा वृत्तपत्रांनी जी भुमिका बजावली त्याला तोड नाही. दलितांच्या कल्याणासाठी डॉ.आंबेडकरांची पत्रकारिता ही उपयुक्त ठरली. गावकुसाबाहेर राहणा-या समाजाला नवी दिशा देण्याचे काम त्यांच्या पत्रकारितेने केले. आत्मविश्वास, स्वाभिमान, देशप्रेम, स्वातंत्र्य तसेच मानवी हक्काची जाणीव बहुजनांत निर्माण करण्याचे फार मोठे कार्य डॉ.आंबेडकरांनी वृत्तपत्रातून केले. त्यामुळे नवा विश्वास, नव्या जाणीवा जनतेत निर्माण झाल्या. शिक्षणाचे महत्व पटल्याने सारा समाज खडबडून जागा झाला. संघटीत होऊन आपल्या न्याय हक्कासाठी संघर्ष करू लागला. अशा प्रकारची चेतना निर्माण झाली. या पाठीमागे डॉ.आंबेडकरांची प्रेरणा होती. अशा प्रकारे डॉ.आंबेडकरांनी वृत्तपत्राच्या माध्यमातून समाजात जागृती करण्याचे फार मोठे कार्य केले.
शासनही समाजातील तळागाळातील जनतेला सोयी सुविधा देण्यासाठी काम करीत आहे. दीनदलितांसाठी अनेक योजना राबवित आहे. झोपडपट्टी सुधार योजना, बेघरांना घरे, वीज, पाणी, रस्ते, शाळा, समाजमंदिरे, स्वंयरोजगार निर्मिती अशा कितीतरी योजना राबवून समाजातील उपेक्षित घटकांचा सामाजिकस्तर उंचवावा म्हणून कार्यरत आहे. डॉ.आंबेडकरांच्या स्वप्नातील दीनदलित समाज अधिक सक्षम, स्वंयपूर्ण, सुशिक्षित होण्याच्यादृष्टीनेच शासनाची वाटचाल सुरु आहे.

* डॉ.सं.शि. खराट
ठाणे
Email - drsskharat@gmail.com