सोलापूर :- महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मर्यादित, मुंबई यांची महाराष्ट्र राज्यात असलेंली पर्यटक निवासे जिल्हा स्तरावर पर्यटकांना उपलब्ध करुन देण्यासाठी महामंडळाकडून स्थानिक अभिकर्त्यांची (Travel agnet/Tour operator) नेमणूक करण्यात येणार आहे. तरी इच्छुक व्यक्तींनी प्रादेशिक कार्यालय पुणे / महामंडळाच्या मुख्य कार्यालयास संपर्क साधावे.
त्यासाठीच्या अटी - शर्ती व इतर सर्व माहिती महामंडळाच्या www. maharashtratourism.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. सोलापूर जिल्ह्यातील सर्व इच्छुक व्यक्तींनी स्थानिक अभिकर्ता म्हणून नेमणूक होण्यासाठी कृपया संकेतस्थळावरुन सर्व माहिती जाणून घेऊन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मर्यादित, मुंबई यांचेकडे आवश्यक त्या कागदपत्रासह अर्ज सादर करावा. स्थानिक पर्यटन स्थळांचा विकास होण्याच्या दृष्टीने व स्वत:चा आर्थिक फायदा होण्यासाठी या योजनेत इच्छुक नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी, सोलापूर यांनी केले आहे.