शाहेदाबी सय्यद
नळदुर्ग -: कॉंग्रेस आय अल्‍पसंख्‍याक महिला विभागाच्‍या जिल्‍हा उपाध्‍यक्षा शाहेदाबी इकरारअली सय्यद यांची तुळजापूर तालुकास्‍तरीय दक्षता समितीच्‍या सदस्‍यपदी निवड करण्‍यात आली आहे. 
जिल्‍हाधिका-यांच्‍या आदेशानुसार तुळजापूर तहसिलदारांनी शाहेदाबी सय्यद यांची तालुकास्‍तरीय दक्षता समितीच्‍या सदस्‍यपदी नियुक्‍ती केली आहे. पालकमंत्री ना. मधुकरराव चव्‍हाण यांनी शाहेदाबी सय्यद यांच्‍या नावाची शिफारस केली होती.  त्‍यांच्‍या या निवडीबद्दल  नगराध्‍यक्ष नितीन कासार, प्रभारी नगराध्‍यक्ष शहबाज काझी यांच्‍यासह नगरसेविका, पंचशिल महिला बचत गटाच्‍या कांचन साखरे, प्‍यारन नदाफ, महादेवी वाघमारे, बानू शेख आदीनी अभिनंदन केले आहे. 

 
Top