सोलापूर :- रब्बी हंगामासाठी सन 2012-2013 या वर्षाकरिता राष्ट्रीय कृषी पिक विमा योजनेत ज्वारी पिकाकरीता 30 नोव्हेंबर पर्यंत अंतिम मुदत होती. इतर पिकांसाठी या योजनेमध्ये सहभागी होण्याची अंतिम मुदत दि. 31 डिसेंबर पर्यंत आहे.
शेतक-यांनी या योजनेत सहभागी होण्यासाठी आपल्या पिकांचा विमा हप्ता आपले खाते सुरु असलेल्या कोणत्याही एकाच बँक शाखेत जमा करावा, विमा प्रस्ताव पत्रकामध्ये पेरणीची, लागवडीची तारिख नमुद करावी, 7/12 चा उतारा जोडावा तसेच प्रस्ताव पत्रकावर तलाठी, कृषी खात्याचे कर्मचारी / अधिकारी यांची सही अथवा शिक्का असावा, प्रत्येक बिगर कर्जदार शेतक-याचे संबंधित बँकेत कोणत्याही प्रकारचे एक खाते असणे बंधनकारक आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील अधिकाधिक शेतक-यांनी अंतिम मुदतीपूर्वी या योजनेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.